आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा; भारताला मिळाला नवा उपकर्णधार, वाचा संपूर्ण यादी

आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयने अखेर भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टी-२० स्वरूपात होणाऱ्या या स्पर्धेसाठी संघाची माहिती दिली. यंदाच्या आशिया कपमध्ये सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार असून, शुभमन गिल उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

asia-cup-2025-team-india-squad-schedule


इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला संघात स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

आशिया कप २०२५ साठी भारतीय संघ:

कर्णधार: सूर्यकुमार यादव

उपकर्णधार: शुभमन गिल

फलंदाज: अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग

अष्टपैलू: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल

यष्टीरक्षक: जितेश शर्मा, संजू सॅमसन

गोलंदाज: जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा

आशिया कपमध्ये प्रथमच ८ संघांचा सहभाग

२०२५ चा आशिया कप ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत अबू धाबी आणि दुबई येथे खेळला जाणार आहे. या वर्षी पहिल्यांदाच आशिया कपमध्ये ८ संघ सहभागी होत आहेत. या सर्व संघांना प्रत्येकी चार संघांच्या दोन गटांमध्ये विभागले गेले आहे. लीग स्टेजमध्ये प्रत्येक संघ ३ सामने खेळेल. त्यानंतर सुपर-४ फेरी होईल आणि त्यातील अव्वल दोन संघ २८ सप्टेंबर रोजी विजेतेपदासाठी भिडतील.

टीम इंडियाचे वेळापत्रक

भारतीय संघ 'अ' गटामध्ये पाकिस्तान, ओमान आणि यूएई सोबत आहे. तर, 'ब' गटामध्ये श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे. भारतीय संघाचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी दुबईमध्ये यूएई विरुद्ध होईल. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तान विरुद्ध त्यांचा दुसरा महत्त्वपूर्ण सामना होणार आहे. गट फेरीतील त्यांचा शेवटचा सामना १९ सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये ओमान विरुद्ध खेळला जाईल.

आशिया कप २०२५ - संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज)

९ सप्टेंबर - अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग

१० सप्टेंबर - भारत विरुद्ध यूएई

११ सप्टेंबर - बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग

१२ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध ओमान

१३ सप्टेंबर - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका

१४ सप्टेंबर - भारत विरुद्ध पाकिस्तान

१५ सप्टेंबर - यूएई विरुद्ध ओमान आणि श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग

१६ सप्टेंबर - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान

१७ सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध यूएई

१८ सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान

१९ सप्टेंबर - भारत विरुद्ध ओमान

सुपर-४ आणि अंतिम सामना:

२० ते २६ सप्टेंबर दरम्यान सुपर-४ मधील सामने होतील.

२८ सप्टेंबर रोजी विजेतेपदाचा अंतिम सामना खेळला जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+