Ind vs UAE भारत युएई सामना, कोण जिंकणार वाचा हेड टू हेड रेकाॅर्ड, मॅचची वेळ काय कुठे मोफत बघता येईल?
Ind vs UAE Who will win match today : भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात आज आशिया कपचा सामना रंगणार आहे. या सामन्यापुर्वीच विजय कुणाचा होणार याचा अंदाज चाहते घेत आहेत. खासकरुन चाहते भारत विजयी होईल असे म्हणत आहेत, पण चाहत्यांना वाटेल तेच होईल असे नाही, म्हणूनच दोन्ही संघात कोण वरचढ आहे हे अनेकजण जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
संयुक्त अरब अमिराती हा संघ क्रिकेटच्या दुनियेत नवखा संघ मानला जातो तर भारत हा बलाढ्य संघ मानला जातो. टी-२० सामन्याच्या इतिहासात भारतीय संघाची दर्जेदार कामगिरी राहीली आहे पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे सामन्याची स्थितीच वरचढ कोण आणि कोण दुबळा हे ठरवते. संयुक्त अरब अमिराती आणि भारतीय संघात आजपर्यंत किती सामने झाले आणि कोणी किती जिंकले, चला आपण जाणून घेऊया.

भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या कर्णधार म्हणून सांभाळत आहे. भारतीय संघाने चांगला सरावही केला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानात नुकत्याच झालेल्या मालिकेत युएईच्या संघाने तिरंगी मालिकेत सहभाग घेतला होता, त्यांचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी होते म्हणजेच युएई संघही कमी तयारी करत नाही हे दिसून येते.
भारत आणि युएईमध्ये आजपर्यंतचे टी-२० सामने
भारत आणि युएईमध्ये आजपर्यंतचे टी-२० सामने पाहता भारत आज जिकंण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय टीममध्ये जागतिक दिग्गज खेळाडू आहेत. अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यासारखे दिग्गज फलंदाज तर जसप्रित बुमराह, वरुण चक्रवर्तीसारखे दिग्गज टी-२० गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय संघ बलाढ्य तर आहेच पण या संघाची जिंकण्याची शक्यताही जास्त आहे.
भारत-यूएई सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि युएई हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री ८ वाजता सुरू होईल. नाणेफेकीची वेळ संध्याकाळी ७:३० वाजता असेल. आशिया कप २०२५ मधील दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे.
IND vs UAE सामना कुठे पाहता येईल?
भारत विरुद्ध युएई हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येणार आहे. याशिवाय हा सामना मोबाईलवर पाहण्यासाठी तुमच्याकडे सोनी ललिव्ह App असायला हवे.
IND vs UAE मोफत बघता येणार का?
भारत आणि युएई हा सामना बघण्यासाठी एकतर तुम्हाला सब्सक्रिप्शन घ्यावे लागू शकते. एअरटेल सीम वापरकर्त्यांकडे काही विशिष्ट रकमेच्या रिचार्जवर काही App's चे सबस्क्रिप्शन सोबत मिळते. एकाअर्थी ही ऑफर वापरकर्त्याने टाकलेल्या रिचार्जवर अवलंबून आहे.
भारतीय संभाव्य संघ - प्लेईंग ११ : शुभमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती/कुलदीप यादव.
युएई संभाव्य संघ - प्लेईंग ११ : मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहेब, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), आसिफ खान, हर्षित कौशिक, मुहम्मद फारूख, सगीर खान, हैदर अली, जुनैद सिद्दीकी, मुहम्मद जवादुल्ला.












Click it and Unblock the Notifications