Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आशिया कप 2025 साठी टीम इंडिया सज्ज! 15 जणांचा संघ, कोण असेल फिनिशर, कुणाचा संघात समावेश? जाणून घ्या

Asia Cup 2025 15 member Indian team ready : आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची 15 सदस्यीय संभाव्य घोषणा करण्यात आली आहे. यंदाची स्पर्धा T-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार असल्यामुळे, निवडकर्त्यांनी जलद, तंदुरुस्त आणि आक्रमक खेळाडूंना संधी देण्यावर भर दिला आहे.

Asia Cup 2025 15 member Indian team ready

इंग्लंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर टीम इंडिया आता आशिया कपसाठी सज्ज झाली आहे. इंग्लड दौऱ्यातील संघापेक्षा हा संघ वेगळा असेल. यंदा पहिल्यांदाच टी-20 प्रकारात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे त्यामुळे भारतीय संघाची मदार जसप्रित बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. आज सलेक्टर टीम निवड करतील त्यापुर्वीच 15 सदस्यीय संघाची माहिती हाती लागली आहे. त्यानुसार, संघात कोण कोण असेल आणि कोण फिनिशर असेल हे जाणून घेऊया.

Take a Poll

सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद

T20 क्रिकेटमधील भारताच्या सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक असलेल्या सूर्यकुमार यादवकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. त्याच्यासोबतच युवा आणि आक्रमक फलंदाज जसे की यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यर यांना संधी मिळणे निश्चित आहे. हे सर्व खेळाडू पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये जलद धावा काढण्याची क्षमता ठेवतात.

संजू सॅमसन करणार विकेटकीपिंग

संघामध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्या खांद्यावर असण्याची शक्यता आहे. हे दोन्ही खेळाडू मोठे फटके मारण्यात तरबेज आहेत आणि फिनिशरची भूमिकाही प्रभावीपणे बजावू शकतात. इंग्लंड दौऱ्यावर दुखापत झाल्यामुळे ऋषभ पंतची निवड होण्याची शक्यता कमी आहे.

अष्टपैलू आणि गोलंदाजी

भारतीय संघाच्या अष्टपैलू विभागात हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे. हे खेळाडू फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही संघाला संतुलन देतील. अनुभवी हार्दिक पंड्याच्या पुनरागमनामुळे संघाला मोठा फायदा होईल.

वेगवान गोलंदाजीची कमान जसप्रीत बुमराह सांभाळेल, त्याच्यासोबत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा असतील. फिरकी विभागात वरुण चक्रवर्ती, तसेच अक्षर आणि सुंदर संघाला बळकट करतील. हे संयोजन UAE च्या खेळपट्ट्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

भारताचा संभाव्य संघ

फलंदाज: सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर

यष्टीरक्षक: संजू सॅमसन, जितेश शर्मा

अष्टपैलू: हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे

गोलंदाज: जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

हेही वाचा : Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तान संघातून बाबर-रिझवान आऊट; जाणून घ्या कोण देणार भारताला आव्हान!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+