सचिन तेंडुलकरांच्या कुटुंबात सनईचौघडे! अर्जुन-सानियाचा शाही विवाह सोहळा संपन्न; दिग्गजांची मांदियाळी
Arjun Tendulkar Sania Chandok marriage : क्रिकेट जगताचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या घरी सध्या आनंदाला उधाण आले आहे. सचिनचा मुलगा आणि युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर आज विवाहबंधनात अडकला आहे. अर्जुनने आपली मैत्रीण सानिया चंडोक हिच्यासोबत साताजन्माची गाठ बांधली. मुंबईतील वरळी येथील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला.

लाल लेहेंग्यात सानियाचं रूप खुललं, अर्जुनचा पारंपरिक थाट
आज सकाळी ११:४५ च्या सुमारास अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा संपन्न झाला. या खास दिनी सानिया चंडोकने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता, ज्यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तर अर्जुनने देखील पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची लगबग सुरू होती. हळदी आणि मेहंदी समारंभाचे फोटो आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्याला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती.
Arjun Tendulkar, the son of Sachin Tendulkar, got married to Saaniya Chandhok today in Mumbai.❤️
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) March 5, 2026
Congratulations to Arjun and Saaniya. Best wishes for a happy life together. 💐 pic.twitter.com/HhkU9is64F
क्रिकेटपासून राजकारणापर्यंत; दिग्गजांची उपस्थिती
तेंडुलकर कुटुंबातील हा सोहळा असल्याने साहजिकच मुंबईत दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. क्रिडा, मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक बड्या हस्तींनी या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी क्रिकेट विश्व महेंद्रसिंह धोनी, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे, युवराज सिंह, झहीर खान, आशिष नेहरा, अजित आगरकर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, इरफान पठाण यांनी हजेरी लावली. तसेच राजकारणातील राज ठाकरे, सुप्रिया सुळे, शायना एन.सी. यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. तसेच मनोरंजन विश्वातील शंकर महादेवन, फरहान अख्तर यासह अनेकांनी उपस्थिती होती.
वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये 'ग्रँड' सोहळा
हा विवाह सोहळा अत्यंत खाजगी पण तितकाच शाही पद्धतीने पार पडला. वरळीतील हॉटेलबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. उपस्थित पाहुण्यांनी कॅमेऱ्यासमोर आनंदाने पोज दिल्या, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांनी स्वतः पाहुण्यांचे स्वागत केले.
सानिया चंडोक कोण आहे?
अर्जुनची पत्नी सानिया चंडोक ही गेल्या काही काळापासून तेंडुलकर कुटुंबाच्या जवळची मानली जाते. सानिया आणि अर्जुन जुने मित्र असून आता त्यांनी आपल्या नात्याला विवाहाचे स्वरूप दिले आहे. सानियाच्या फॅशन सेन्सचे आणि तिच्या साध्या पण मोहक लूकचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.












Click it and Unblock the Notifications