सचिन तेंडूलकरची होणारी सून सानिया चांडक कोण आहे? अर्जून तेंडूलकरशी ठरली लग्नगाठ, साखरपुडाही झाला!
Arjun Tendulkar Engagement Who is Sania Chandok : क्रिकेटचा देव ज्याला देशातील क्रिकेटरसिक मानतात, त्या दिग्गज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि आयपीएल स्टार अर्जुन तेंडुलकर १३ ऑगस्टला बुधवारी एका खाजगी समारंभात सानिया चांडोक यांचा साखरपुडा झाला आहे. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
मिडिया रिपोर्टनुसार, हा कार्यक्रम १३ ऑगस्ट रोजी झाला असून तेंडुलकर कुटुंबाने अद्याप सोशल मीडियावर यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलेले नाही. आता तेंडूलकरांच्या चार जणांच्या कुटुंबात पाचवा सदस्य येणार आहे.

आयपीएलमध्ये अर्जून खेळतो मुंबई संघाकडून
सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन हा व्यावसायिक क्रिकेटर आहे. त्याने आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून यापुर्वी सामने खेळले आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. त्याचे वडील सचिन दिग्गज ख्यातनाम फलंदाज आहेत. दोघांत फरक म्हणजे वडील उजव्या हाताने फलंदाजी करतात तर अर्जुन डावखुरा गोलंदाज आहे. त्याने २०१८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारताकडून १९ वर्षांखालील गटात पदार्पण केले. आता सचिन तेंडूरकरची होणारी सून आणि अर्जूनची होणारी पत्नी कोण आहे याचीच रसिकांना उत्सुकता आहे. चला तर आपण सानिया चांडोक कोण आहे हे जाणून घेऊया.
सानिया चांडोक कोण आहे? (Who is Sania Chandok)
- सानिया चांडोक, ही मुंबईतील व्यापारी रवी घई यांची नात आहे आणि आतिथ्य आणि फुड इंडस्ट्रीसह आदी क्षेत्रातील एका प्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातील ती आहे.
- इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तिच्या कुटुंबाकडे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी आहे.
- सानियाने अर्जुन आणि सारा तेंडुलकरसह ८०५ फॉलोअर्ससह एक खाजगी इंस्टाग्राम प्रोफाइल ठेवली आहे.
- सानिया प्रमाणित पशुवैद्यकीय तंत्रज्ञ म्हणून WVS मध्ये ABC त एज्युकेशन प्रोग्रॅम पूर्ण केला आहे.
- सानियाने मिस्टर पॉज या नावाने एक पाळीव प्राण्यांचे स्किनकेअर ब्रँड स्थापन केला.
- सानियाचे सार्वजनिक प्रोफाइल फार जास्त नाही. मात्र, लग्नाच्या बातम्यांमुळे चाहते सोशल मीडियावर तिचे अभिनंदन करत आहेत.
रवी घई कोण आहेत? (Who is Ravi Ghai)
सानिया रवी घई यांची नात आहे तर रवी घई यांचा हॉस्पिटॅलिटी आणि फूड व्यवसाय आहे, त्यांच्याकडे मुंबईत पंचतारांकित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी ब्रँड आहे. त्यांची एक कंपनी ग्रॅव्हिस हॉस्पिटॅलिटी लिमिटेड या नावाने शेअर बाजारात नोंदणीकृत आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, क्वालिटी हा आईसक्रिम ब्रँडही रवी घई यांचा आहे, घई कुटुंबाकडे ग्रॅव्हिस गुड फूड्सचीही मालकी आहे. अहवालानुसार, ग्रॅव्हिस गुड फूड्सची मार्केट कॅप ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रवी घई यांच्याकडे कंपनीत २१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स आहेत.
अर्जून-सानियाला चाहत्यांकडून शुभेच्छा
अर्जुन आणि सानिया दोघांनाही विविध प्लॅटफॉर्मवर अभिनंदन संदेश पाठवणाऱ्या चाहत्यांना लग्नाच्या बातमीने आनंद झाला आहे. ते एकत्र या नवीन अध्यायात प्रवेश करत असताना, या तरुण जोडप्यासाठी पुढे काय आहे हे पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.












Click it and Unblock the Notifications