कोण आहे अमोल मुजुमदार? सचिन, कांबळीमुळे हुकली संधी पण महिला संघाच्या विश्वविजेतेपदात मोलाचा वाटा
Amol Mazumdar : भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच वनडे आंतरराष्ट्रीय विश्वचषक जिंकून इतिहास घडवला. हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना यांसारख्या खेळाडूंच्या कर्तृत्वाचे कौतुक होत असताना, या ऐतिहासिक विजयाचा एक 'पडद्यामागचा नायक' आज प्रकाशझोतात आला आहे. ते आहेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अमोल अनिल मजूमदार!

ज्या खेळाडूला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या 'स्टारडम'मुळे भारतीय संघात कधी संधी मिळाली नाही, त्याच खेळाडूने आज प्रशिक्षक म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघाला पहिला-वहिला विश्वचषक जिंकवून दिला, ही खास बाब आहे.
संधी हुकण्याचे दुःख आणि ऐतिहासिक यश
अमोल मजूमदार हे त्या मुंबई संघाचा भाग होते, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी ६६४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली होती. या भागीदारीत मजूमदार पुढील फलंदाजीसाठी पॅड लावून बसले होते, पण त्यांना खेळायलाच मिळाले नाही. ही संधी तेव्हा त्यांची हुकली होती.
रणजी पदार्पण
अमोल मुजुमदार १९९३-९४ मध्ये रणजी पदार्पणातच नाबाद २६० धावा ठोकून विश्वविक्रम केला होता, जो अनेक वर्षे कायम राहिला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ११ हजारांहून अधिक धावा करूनही, भारताच्या मधल्या फळीत सचिन, द्रविड आणि गांगुली यांसारखे दिग्गज असल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही.
प्रशिक्षकाची भूमिका
ऑक्टोबर २०२३ मध्ये, त्यांनी भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या शांत, स्पष्ट आणि भावनिक नेतृत्वाने संघाला एक नवी दिशा दिली.
This is getting too emotional 🥹 😭🤧
— Divya Thamizh Bharathi (@Divya_DTB) November 2, 2025
India deserve this kind of head coach, When player like Harman openly bows down to you.
Amol Muzumdar✨🔥💙#harmanpreet #INDWvsSAW pic.twitter.com/wMiGPTSz4T
सलग ३ पराभवानंतर ऐतिहासिक क्षण
वर्ल्डकप स्पर्धेत सलग तीन पराभवांनंतर, इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी खेळाडूंना दिलेले 'आक्रमक' पण प्रेरणादायक भाषण टीमसाठी टर्निंग पॉईंट ठरले, असे कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले. यानंतर संघाने पुनरागमन करत प्रथमच वर्ल्डकप जिंकला. वर्ल्डकप जिंकल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने गुडघे टेकून त्यांचे आशीर्वाद घेतले, जो क्षण मजूमदार यांच्या कोचिंग प्रवासातील सर्वात भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला.
अमोल मजूमदार यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून जे यश मिळवू शकले नाहीत, ते त्यांनी आज विश्वविजेत्या संघाचे प्रशिक्षक म्हणून मिळवले आहे आणि क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव 'अमर' केले आहे.












Click it and Unblock the Notifications