Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Afg vs Aus Head to Head : ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, मात्र अफगाणिस्तानाला हलक्यात घेऊन चालणार नाही

Afg vs Aus Head to Head Record : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा संघ आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. ग्रुप बी मधील तीन संघांसाठी उपांत्य फेरीचा मार्ग अजूनही खुला आहे हे लक्षात घेता ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान यांच्यातील हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा सामना शुक्रवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे.

या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन एकदिवसीय क्रिकेट संघाची धुरा स्टीव्ह स्मिथकडे आहे. अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट संघाची धुरा हशमतुल्लाह शाहिदीकडे असणार आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. या सामन्यात जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचणार आहे. जो संघ जिंकेल त्यांचा सामना न्यूझीलंड किंवा भारताशी होईल. गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तान क्रिकेटने ज्या पद्धतीने मोठ्या संघांचा पराभव केला आहे ते लक्षात घेता, कोणताही संघ त्यांना हलक्यात घेऊ इच्छित नाही.

Afghanistan

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमच्या खेळपट्टीचा रिपोर्ट

आतापर्यंत, गद्दाफी स्टेडियमवरील मोठ्या धावसंख्येच्या खेळपट्टीने वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांना फारशी मदत केलेली नाही. अशा परिस्थितीत या खेळपट्टीवर पुन्हा एकदा मोठी धावसंख्या होताना दिसू शकते. जेव्हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या मैदानावर आमनेसामने आले तेव्हा 350 हून अधिक धावांचा पाठलाग करण्यात आला. त्याचप्रमाणे अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना 300 पेक्षा जास्त धावा करण्यात यश आलं होतं. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात पुन्हा 300 पेक्षा जास्त धावा होऊ शकतात.

अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया हेड टू हेड रिकॉर्ड

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या हेड-टू-हेड रेकॉर्डनुसार दोन्ही संघांनी आतापर्यंत एकदिवसीय इतिहासात फक्त 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ विजयी झाला आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तानच्या एकदिवसीय संघाला आतापर्यंत एक ही विजय मिळवता आला नाही.

टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाला केला आहे पराभव

टी-20 क्रिकेटमध्येही हे दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच आमनेसामने आले आहेत. 2022 च्या टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने एका रोमांचक सामन्यात 4 धावांनी विजय मिळवला होता, तर 2024 च्या टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करत इतिहास रचला होता. दोन्ही संघ दोनदा एकमेकांसमोर आले आहेत आणि दोघांनीही प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी जेव्हा अफगाणिस्तान संघ लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना करेल, तेव्हा सामना हा सामना कोण जिंकेल हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

अफगाणिस्तान: रहमानउल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), आर शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), सेदिकुल्लाह अटल, इब्राहिम झदरान, गुलबदिन नायब, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, फजलहक फारुकी, नूर अहमद

ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅलेक्स कॅरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झांपा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+