अभिषेक शर्माची रापचिक खेळी! फक्त ३७ चेंडूत ठोकलं शतक; वाचा, कोणते दोन विक्रम केले?

मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने इतिहास रचला. अभिषेकने इंग्लंजच्या गोलंदाजांना सळो की पळो करत, फक्त ३७ चेंडूत शतक ठोकले. या खेळीत अभिषेकने अनेक विक्रम नोंदवले. वेगवान अर्धशतक आणि वेगवान शतक या दोन्ही यादीत अभिषेक शर्मा जावून बसला.

Abhishek Sharm

अभिषेकचे विक्रमी शतक

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माची बॅट तळपली. संजू सॅमसन बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने आपला आक्रमक अंदाज दाखवला. भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. मुंबईच्या वानखेडे मैदानात अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं. अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना कोणतीच दया माया दाखवली नाही. गोलंदाज कोणीही असो त्याला त्याच अंदाजात उत्तर दिलं. अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतक पूर्ण केलं. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 10 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट हा 270.27 चा होता.

अभिषेकचे दुसरे शतक

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे तिसरं वेगवान शतक आहे. यापूर्वी डेव्हिड मिलरने बांगलादेशविरुद्ध 35 चेंडूत 2017 मध्ये वेगवान शतक ठोकलं होते. त्यानंतर रोहित शर्माने 2017 मध्येच श्रीलंकेविरुद्ध 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. आता अभिषेक वेगवान शतकवीरांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर जावून बसला आहे. त्याने या सामन्यात 37 चेंडूत इंग्लंडविरुद्ध शतक ठोकलं.

कशी झाली भारताची सुरुवात

टीम इंडियासाठी पॉवर प्लेमधील सहा षटकं खूप चांगली गेली. भारतीय संघाने 1 गडी गमावून 95 धावा केल्या. यादरम्यान अभिषेक शर्माच्या बॅटमधून 58 धावा आल्या. तर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यात चांगली भागीदारी पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंनी 36 चेंडूत 100 धावा केल्या आहेत. अभिषेक शर्माने अवघ्या 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेक शर्माने वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येऊन बसला आहे. या यादीत 12 चेंडूत अर्धशतकी खेळी करणारा युवराज सिंग पहिल्या स्थानावर आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+