Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

19 चौकार, 12 षटकार अन् धावा 250! 14 व्या वर्षी या खेळाडूने ठोकले द्विशतक; वडील करतात मोलमजुरी

14-year-old Mohammad Kaif hits double century : अवघ्या 37 चेंडूत शतक ठोकणारा राजस्थान राॅयल्सचा खेळाडू वैभव सूर्यवंशीने अवघ्या 14 व्या वर्षी आपल्या खेळाने जगातील क्रीडा रसिकांचे ध्यान आपल्याकडे खेचून घेतले. आयपीएलमध्ये दुसरे सर्वात जलद ठोकणारा तो फलंदाज बनला. आता या बिहारी फलंदाजाच्या पावलावर पाऊल ठेवत उत्तर प्रदेशातील आणखी एका 14 वर्षीय खेळाडूने धमाकेदार कामगिरी करत क्रीडा रसिकांचे लक्ष वेधले आहे.

देहारादून येथे खेळल्या गेलेल्या राजसिंह डुंगरपूर अंडर 14 प्रतियोगितेचा अंतीम सामन्यात उत्तरप्रदेश आणि विदर्भ संघात खेळला गेला. यामध्ये युपीच्या मोहम्मद कैफ या चौदा वर्षीय खेळाडूने मैदानात उतरुन असा काही धमाका केला की, सर्वजण पाहतच राहीले. या खेळाडूने आयपीएल खेळणारा वैभव सूर्यवंशी याच्याच पावलावर पाऊल ठेवले असे म्हणावे लागेल.

14-year-old Mohammad Kaif hits double century

चौदा वर्षीय खेळाडूची सहा तास फलंदाजी

चौदा वर्षीय खेळाडू मोहम्मद कैफ याने आपल्या खेळीत विदर्भाविरुद्ध तब्बल सहा तास फलंदाजी केली. या सामन्यात त्याने चौकार-षटकारांची बरसात केली. त्याने 19 चौकार आणि 12 षटकारांसह 377 धावा कुटल्या, यावेळी त्याची सरासरी 89.29 अशी होती.

250 धावा करुन सामना फिरवला

युपी आणि विदर्भ यांच्यातील सामन्यात मोहम्मद कैफने अडीचशे धावा केल्या यात त्याने 280 चेंडूचा सामना केला आणि हा सामना युपी संघाला जिंकून दिला.

कोण आहे मोहम्मद कैफ?

मोहम्मद कैफ हा उत्तरप्रदेशातील खेळाडू आहे. तो कानपूरमध्ये झालेल्या चाचणीतून उत्तर प्रदेशच्या चौदा वर्षीय संघात त्याची निवड झाली होती. या स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली.

भारताचा माजी स्टार खेळाडू आणि समालोचक मोहम्मद कैफ याच्या नावाशी साधर्म्य असलेला उत्तरप्रदेशचा मोहम्मद कैफ या खेळाडूची आर्थिक परिस्थीती अत्यंत साधारण आहे. त्याच्या वडीलांचे नाव मुन्ना असून ते मोलमजुरी करतात. त्यांना सात मुलं असून त्यातील एक मोहम्मद कैफ हा आहे.

वैभवसारखीच कैफची खेळी

अवघ्या चौदाव्या वर्षी शतक झळकावून आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशी हा आपले नाव कमवत आहे अगदी तसाच मोहम्मद कैफ हा खेळाडू असून मोहम्मद कैफ हाही प्रतिभावान आहे हे त्याने आपल्या खेळीने दाखवून दिले आहे. आता क्रिकेटच्या अवकाशात हा नवा तारा लुकलुकत आपले कसब दाखवण्यास सज्ज झाला आहे.

हेही वाचा : Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी 14 वर्षांचा नव्हे! त्याचं वयं एवढं.. 'हा' दावा आला समोर खरं काय?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+