...अन् क्षणात होत्याचे नव्हते! नाशिक येथे भीषण अपघात, 4 जण जागीच ठार, दोघे जखमी

नाशिक जिल्हा- नाशिक शहराजवळ टायर फुटून ट्रक कारवर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर दोघे जखमी झाले. हा अपघात नाशिक शहराजवळी आडगावजवळ काल रात्री पावणे अकरा
वाजेच्या सुमारास घडला.

कारचा चक्काचूर

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात खत पुरवण्यासाठी आलेला माल ट्रक चालक नाशिककडून ओझरकडे जात असताना आडगाव येथे त्याच्या ट्रकचे टायर फुटले आणि ट्रक समोरून येणाऱ्या कार वर आढळली त्यामुळे कारचा चक्काचूर झाला.

car accident

यांचा झाला मृत्यू

ट्रक कारवर आदळल्यानंतर या कारमधील चौघांचा मृत्यू झाला. यात कारमधील सज्जू शेख, अक्षय जाधव, अरबाज तांबोळी आणि रहेमान तांबोळी यांचा मृतात समावेश आहे.तर ट्रक चालक बापू आहिरे आणि सहचालक सचिन म्हस्के हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

कारचा पत्रा कापून काढले बाहेर

अपघात एवढा भीषण होता की, कारचे पत्रे कापून मृत आणि जखमींना बाहेर काढावे लागले. यातील जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

सर्व मृत नाशिकचे

अपघातात ठार झालेले सर्व जण नाशिक शहरातील इंदिरा नगर आणि सिडको येथील रहिवासी असून भाजीपाला व्यापारी आहेत. भाजीपाल्याच्या कामासाठी ते बागलाण येथे कारने गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्हीही पाहिले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+