झीशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर
Zeeshan Siddique News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते आणि माजी महाराष्ट्र मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी एका ईमेलद्वारे देण्यात आली असून त्यात त्यांना त्यांच्या वडिलांसारखी हत्या करण्याची धमकी देण्यात आला आहे. यासोबतच 10 कोटी रुपये मागण्यात आले असून धमकी देणारा व्यक्ती दर सहा तासांनी, असे ईमेल पाठवण्याचा इशाराही दिला आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून झीशान यांच्या बांद्रा येथील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकीच्या हत्येची घटना
गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील निर्मल नगर येथील त्यांच्या कार्यालयाजवळ तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केली होती. आतापर्यंत या प्रकरणात सलमान वोहरा आणि आकाशदीप सिंग यांना अटक करण्यात आली आहे. व्होरा यांच्यावर हत्येसाठी पैसे पुरवल्याचा आरोप आहे. याशिवाय गँगस्टर अनमोल बिश्नोई आणि इतर दोघांविरुद्ध आधीच अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

झीशान सिद्दीकीची प्रतिक्रिया
झीशान सिद्दीकी म्हणाले, 'मेलमध्ये नमूद केल्याप्रमाणे मला डी कंपनीकडून धमक्या मिळाल्या आहेत. त्यांनी 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. पोलिसांनी माझा जबाब नोंदवला आहे. आमचे संपूर्ण कुटुंब या परिस्थितीमुळे भीतीदायक वातावरण आहे.
मुंबई पोलिसांकडून तपास सुरु
- मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखा आता धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यात व्यस्त आहेत.
- ईमेल पाठवणाऱ्याचा आयपी शोधला जात आहे.
- सुरक्षा एजन्सींनी झीशान सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवली आहे.
- बिश्नोई टोळी आणि डी कंपनी यांच्यात काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.
कोण आहेत झीशान सिद्दीकी ?
झीशान सिद्दीकी हे माजी आमदार आहेत. झीशान यांनी काँग्रेस पक्षातून राजकीय प्रवास सुरू केला होता. 2024 मध्ये त्यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एनसीपीमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर झीशान यांनीही काही महिन्यांपूर्वी एनसीपीत प्रवेश केला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर झीशान यांनी आपल्या वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून काम सुरू ठेवले आहे.
बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी बांद्रा येथील त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येसाठी लॉरेंस बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली होती आणि आतापर्यंत या प्रकरणात 10 हून अधिक संशयितांना अटक झाली आहे. बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणी आणि बॉलिवूडमधील जवळच्या संबंधांसाठी ओळखले जात होते, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबावर नेहमीच लक्ष्य राहिले आहे.












Click it and Unblock the Notifications