Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोजगाराच्या प्रश्नाला महायुती हेच उत्तर; नांदेड दक्षिणमध्ये आनंद तिडकेंना युवकांचा प्रतिसाद

Maharashtra Assembly Election 2024 : नांदेड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आ. मोहन हंबर्डे यांना यावेळी चांगली कसरत करावी लागणार आहे. नांदेड दक्षिणमधून महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाने आनंद तिडके पाटील (बोंडारकर) यांनी तिकीट दिल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत पहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसचे आ. मोहन हंबर्डे यांचे सख्खे बंधू डाँ. संतुकराव हंबर्डे हे भाजपकडून लोकसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. मोहन हंबर्डे यांना कसे स्वीकारतील, हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. दरम्यान, महायुतीने या निवडणुकीत चांगली ताकद लावल्याने आनंद तिडके यांचे पारडे सध्यातरी जड दिसत आहे.

Maharashtra Assembly Election 2024

गेल्यावेळी फक्त साडेतीन हजारांचे लीड

काँग्रेसचे विद्यमान आ. मोहनराव हंबर्डे हे गेल्यावेळी अपक्ष दिलीप कुदकुर्ते यांच्याविरोधात फक्त साडेतीन हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. यावेळी परिस्थिती आणखी बिघडलेली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट व विद्यमान आमदारांवर असलेली नाराजी पाहता येथे काँग्रेसच्या उमेदवाराला आपली जादू दाखवता येईल का, हा प्रश्न आहे. याशिवाय काँग्रेसकडून ओमप्रकाश पोकर्णा हे देखील इच्छुक होते, मात्र काँग्रेसने पुन्हा हंबर्डे यांच्यावर विश्वास दाखविल्याने पोकर्णा यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. गेल्यावेळी फक्त साडेतीन हजारांचे लीड यावेळी हंबर्डे यांच्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

मतदारसंघातील प्रश्न कायम

विद्यमान आ. मोहनराव हंबर्डे यांनी गेल्या पाच वर्षात विकासकामे केल्याचा दावा केला असला तरी मतदारसंघातील अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. नांदेड दक्षिण मतदारसंघात रोजगाराची मोठी समस्या आहे. येथे उद्योगधंदे सुरु नाहीत, त्यामुळं नोकरीसाठी तरुणांना पुणे, हैदराबाद, मुंबई, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी जावं लागतं. त्यामुळं याठिकाणी एमआयडीसी व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र हंबर्डे सत्तेत नसल्याने एमआयडीसीचा पाठपुरावा कसा होणार हा खरा प्रश्न आहे. येथे एमआयडीसीचा मुद्दा मार्गी लावायचा असेल तर महायुतीच्या उमेदवाराशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. त्यामुळेच महायुतीचे उमेदवार आनंद तिडके यांचे पारडे आत्तापासूनच जड असल्याचे बोलले जात आहे.

नांदेडमध्ये महायुतीचा विकासकामांचा डोंगर

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारने कोट्यवधींची विकासकामे केली. शिवाय शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची संख्याही येथे लक्षणिय आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मतदारसंघातील सुमारे ७० हजार महिलांनी घेतलाय. त्याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेलाही या तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मोफत वीजेचे लाभार्थी शेतकरीही या मतदारसंघात लक्षणिय आहेत. शिवाय आरोग्य व शिक्षण क्षेत्रातही या मतदारसंघात महायुतीने चांगले काम केलेले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आनंद तिडके यांना ही निवडणूक सोप्पी जाईल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून लावला जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+