Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज आणि काॅल करुन त्रास देणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या! कोण आहे आरोपी वाचा

Suspect arrested for harassing Pankaja Munde : भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मॅसेज पाठवून, काॅल करुन त्रास देणाऱ्या माथेफिरू तरुणाला अटक करण्यात आली आहे.

या संशयिताला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे यांना हा माथेफिरू काॅल आणि मेसेज करुन त्रास देत होता. या संशयिताला पुण्यात अटक झाली आहे. संशयिताचे नाव अमोल काळे असे आहे.

Pankaja Munde

पुण्यातील भोसरी पोलिसांच्या सहकार्याने त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन त्याचा ठावठिकाणा मिळवल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.

कोण आहे संशयित?

  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताचे नाव अमोल काळे आहे.
  • संशयित अमोल काळे हा 25 वर्षांचा आहे.
  • पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि काॅल करुन त्रास दिल्याप्रकरणी त्याच्यावर बीएनएसच्याकलम 78 आणि 79 तसेच
  • भारतीय तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
  • गुन्हा दाखल होताच सायबर पोलिसांनी त्याला पुण्यातून भोसरी पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.

संशयित आरोपी निघाला परळीचा!

संशयित आरेपी अमोल काळे याला पुण्यातून जरी अटक केली असली तरीही तो पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यातील म्हणजेच धनंजय मुंडे आमदार असलेल्या परळीचा आहे. त्याने का आणि कशामुळे पंकजा मुंडे यांना काॅल आणि मेसेज करुन त्रास दिला हे मात्र अद्याप समोर आले नसून पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

प्राप्त माहितीनुसार पंकजा मुंडे यांना काॅल करुन संशयित अमोल काळे हा त्रास देत होता, गेल्या काही दिवसांपासून तो त्रास देत होता, दरम्यानच्या काळात त्याने पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज केल्याचे समोर आले आहे. या प्रकरण पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार, आधी अज्ञात व्यक्तीविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.

तपासादरम्यान काॅल करणारा भोसरी भागात असल्याची माहिती पोलिसांना समजली.पंकजा मुंडे यांना त्रास दिल्याच्या प्रकरणात संशयित अमोल काळे हा असून त्याची माहिती घेत सायबर पोलिसांनी अमोल काळे याल अटक केली. दरम्यान तो विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान त्याने आपण पंकजा मुंडेंना काॅल आणि मेसेज केल्याची कबुली दिल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

हेही वाचा : Meghna Alam : राजदूताशी प्रेमप्रकरण, वसूली अन् फेसबूक लाईव्ह करताना अटक! कोण आहे मॉडेल मेघना आलम?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+