Meghna Alam : राजदूताशी प्रेमप्रकरण, वसूली अन् फेसबूक लाईव्ह करताना अटक! कोण आहे मॉडेल मेघना आलम?
Who is Model Meghna Alam : बांगलादेशची लोकप्रिय मॉडेल मेघना आलम हिला 9 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. अभिनेत्री मेघना आलम हिचे सौदी अरेबियाच्या राजदुताशी असलेल्या प्रेमप्रकरण ठेवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिच्यावर देशाची सुरक्षा धोक्यात आणण्याचा आणि आर्थिक हितसंबंधांना हानी पोहोचवण्याचा आरोप आहे.
मेघनाचे वडील बदरुल आलम म्हणाले की, पोलिसांनी त्यांच्या मुलीला कोणत्याही आरोपपत्राशिवाय ताब्यात घेतले आहे. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. मेघनाच्या अटकेचे मुख्य कारण सौदी अरेबियाच्या राजदूताशी असलेले तिचे संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

फेसबूक लाईव्हदरम्यान अटक
अटक होण्यापुर्वी मेहघना आलम फेसबूकवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत होती. त्यानंतर बांग्लादेश गुप्तहेर खासेच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलिसांनी तिच्या घरात प्रवेश करुन तिला विशेषाधिकार कायद्याखाली अटक करण्यात आली.
दरम्यान, मेघना आलमच्या सोशल मीडियावरील तिने यासंबंधीत पोस्ट टाकली. त्यानंतर तिच्या चाहत्यांनाही या घटनेचा धक्का बसला आहे. डेली स्टारच्या वृत्तानुसार, बांगलादेशी अधिकाऱ्यांकडून तिला गप्प केले जात होते. अटक होण्यापूर्वी, आलमने कथित प्रकरणाची माहिती देणाऱ्या अनेक फेसबुक पोस्ट्स केल्या, परंतु नंतर त्या हटविण्यात आल्या.
मेघनाची 8 एप्रिल 2025 रोजीची फेसबूक पोस्ट (त्या तारखेनंतरच्या काही पोस्ट हटवण्यात आल्या आहेत.)
कोण आहे मेघना आलम? (Who is Model Meghna Alam)
- प्राप्त माहितीनुसार, मेघना आलम एक बांगलादेशी अभिनेत्री, पर्यावरण वकील आणि मिस अर्थ बांगलादेश 2020 विजेती आहे.
- मेघना आलम मिस बांगलादेश फाउंडेशनची अध्यक्षा देखील आहे.
- मेघनाला एप्रिल 2025 मध्ये कथित राष्ट्रीय सुरक्षेला धोका म्हणून ताब्यात घेण्यात आले. तिची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा मानवाधिकार संघटनांनी केला आहे.
मेघना आलमचे करिअर
- मेघना आलम हिने एकोट्रो फाउंडेशनची स्थापना केली आणि सीईओ म्हणून काम केले.
- एक महिला नेतृत्व प्रशिक्षक म्हणून तिने काम केले आहे.
- 2019 मध्ये मिस युनिव्हर्स बांगलादेश स्पर्धेत भाग घेतला आणि ती 18 व्या स्थानावर राहिली.
- 2020 मध्ये, आलमने स्पर्धा केली आणि मिस अर्थ बांग्लादेश जिंकला.
मेघनाल कारागृहात हलवले
मध्यरात्री न्यायालयाच्या आदेशानंतर मेघना आलमला काशिमपूर मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले. त्यानंतर बांगलादेशातील सौदी अरेबियाच्या दूतावासातील वरिष्ठ मुत्सद्दी यांनी केलेल्या तक्रारीनंतर तिला ताब्यात घेण्यात आले आहे. मेघनाचे सौदी अरेबियातील बांगलादेशातील राजदूत इसा युसूफ इसा अल दुहाईलन (Essa Yousef Essa Al Duhailan) यांच्याशी नातेसंबंधात असल्याचे सांगितले जात आहेत. विशेष अधिकार कायद्यांतर्गत सुरक्षा आदेशानुसार तिला 30 दिवसांच्या नजरकैदेत ठेवण्यात आले होते, जे कोणत्याही पडताळणीशिवाय ताब्यात ठेवण्याची परवानगी देते.












Click it and Unblock the Notifications