Yogesh Kadam Biography :वडीलांचा वारसा मुलाकडे! योगेश कदम यांनी घेतली राज्यमंत्रीपदाची शपथ
Yogesh Kadam Biography : शिवसेनेत संपूर्ण हयात घालवणाऱ्या रामदास कदम यांनी राजकीय ठसा उमटवला. त्यानंतर त्यांचाच वारसा आता त्यांचे सुपूत्र योगेश कदम यांनी पुढे समर्थपणे चालवला आहे. त्यांनी आज महायुती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
नागपूर येथे विधानभवनात आयोजित शानदार समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. आता त्यांना कोणते खाते मिळेल हाच आता उत्सुकतेचा विषय आहे. मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरात कार्यक्षेत्र असलेल्या रामदास कदम यांनी संघटनेत आपला स्वतःचा ठसा निर्माण केला. त्यांना खेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने संधी दिली आणि त्या संधीचे रामदास कदम यांनी सोने केले.

खेड, दापोली मंडणगड, गुहागर या परिसरात रामदास कदम यांनी आपला दबदबा निर्माण केला. रामदास कदम यांना पुढे मंत्री पद देण्यात आले. नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदाची धुरा बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासाने रामदास कदम यांच्या खांद्यावर सोपवली. ती जबाबदारी आपल्या आक्रमक स्वभावाने रामदास कदम यांनी पार पाडली. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रामदास कदम हे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत होते.
योगेश कदम यांचा विधानसभेत प्रवेश
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांची पुढची पिढी म्हणजेच योगेश कदम यांनी दापोली मतदार संघातून राष्ट्रवादीचे संजय कदम यांचा पराभव केला आणि विधानसभेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद पटकावले आणि आपला पुत्र आदित्य ठाकरे यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद देऊन टाकले. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत रामदास कदम यांना किंवा योगेश कदम यांनाही मंत्रिपद मिळाले नाही. 2022 साली शिवसेनेत उलटफेर झाला आणि चाळीस आमदार तसेच आठ मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून दिले.
रामदास कदम यांचा आक्रमक वारसा
योगेश कदम यांना रामदास कदम यांचा आक्रमक वारसा लाभला आहे. दापोली मतदारसंघात राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराचा पराभव करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. ते प्रतिनिधित्व करीत असलेला दापोली तालुका हा पर्यटन दृष्ट्या खूपच महत्त्वपूर्ण तालुका आहे. दापोली शहर, हर्णै किनारा, आंजर्ले, दाभोळ, चिखलगाव अशी महत्त्वाची पर्यटन स्थळे दापोली मतदारसंघात येतात. कृषी विद्यापीठ देखील दापोली शहरातच आहे. महाराष्ट्रभरातील पर्यटक थंड हवेचा आनंद घेण्यासाठी दापोलीकडे मोठ्या संख्येने धाव घेतात. शहर वजा खेडे असलेल्या दापोलीच्या विकासासाठी योगेश कदम यांनी प्रचंड प्रयत्न केल्याचे गेल्या पाच वर्षात दिसून आले.
मुख्य बाजारपेठेच्या इमारतीची उभारणी
दापोली हे समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेले शहर आहे. पण महामार्गापासून लांब असल्यामुळे येथे वाहतुकीची समस्या रात्री उशिरानंतर निर्माण होते. दापोलीच्या परिसरातील खेडी मुख्य बाजारपेठेसाठी शहरावरच अवलंबून आहेत. या शहरात मुख्य बाजारपेठेची इमारत उभारण्यासाठी योगेश कदम यांनी प्रयत्न केले आणि ती इमारत पूर्णत्वास नेली. मुख्य बाजारपेठेची इमारत पूर्णत्वास गेल्यामुळे स्थानिक भाजी विक्रेते आणि शेतकऱ्यांना मोठा लाभ झाला आहे आणि त्यांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications