Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माझी आई मला परत द्या! ती माझे सर्वस्व अपघातात मृत महिलेच्या लेकीला अश्रू अनावर

मुंबई - "माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती, ती गेली,मी रडल्याचे तिला आवडणार नाही. पण मी स्वतःला थांबवू शकत नाही; मला माझी आई परत करा" असा टाहो फोडत वरळी हिट अँड रन प्रकरणातील मृत महिलेच्या मुलीने आक्रोश केला. तिच्या डोळ्यात फक्त अश्रूच होते, वडिल कसेबसे तिला सावरत होते. पण त्यांच्याही डोळ्यात आसंवं होती. या दृष्यांनी अनेकांचे काळीज हळहळले.

ती पहाट ठरली काळरात्र

रविवार (ता. 7) जुलैची पहाट वरळीतील कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या नाखवा कुटुंबासाठी काळरात्र ठरली. भल्या पहाटे उठून प्रदीप नाखवा आणि त्यांची पत्नी कावेरी नाखवा हे मुंबईतील वरळीत असलेल्या मासळी बाजारात माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जात होते.

mumbai hit and run

येथील प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला कार धडकली. या अपघातात दाम्पत्य कारच्या बोनटवर पडले पण प्रदीप नाखवा यांनी प्रसंगावधान राखत जीव वाचवला. पण कारने कावेरी नाखवा यांना फरफटत नेले. त्यात त्या ठार झाल्या.

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी रविवारीच कारचालक मिहीर शहा याचे वडील आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना अटक केली होती. त्यानंतर आज मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक केली. त्याच्यावर आपल्या भरधाव वेगातील बीएमडब्ल्यू कारने कावेरी नाखवा या महिलेचा बळी घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मिहीरसह त्याला मदत करणाऱ्या आई व बहिणीसह एकूण 12 जणांना ताब्यात घेतले आहे.

दुःखाची भरपाई होऊ शकत नाही

पोलिसांनी या प्रकरणी कितीही कठोर कारवाई केली, तरी पीडित नाखवा कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखाची भरपाई होऊ शकत नाही. त्यातच कावेरी यांच्या मुलीचा आपल्या आईला परत येण्याची आर्त साद घालतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती उपस्थितांना मला माझी परत हवी असल्याचे म्हणताना दिसून येत आहे.

माझी आई मला परत हवी

कावेरी नाखवा यांच्या मुलीला आपली आई या जगातून गेल्याचे अतीव दुःख झाले. वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यात ती आपली आई गेल्याने दुखी झाली असून मी रडलेले माझ्या आईला आवडणार नाही. पण मी प्रयत्न करूनही डोळ्यांतील अश्रू थांबवू शकत नाही. माझी आई माझे सर्वस्व होती. ती मला परत पाहिजे. माझी आई कधी परत येईल? असा काळजाला हात घालणारा प्रश्न सदर मुलगी विचारताना व्हिडिओत दिसून येत आहे.

डोळ्यात फक्त आसंवं..

अपघातातील प्रत्यक्षदर्शी आणि अपघातातील जखमी प्रदीप नाखवा यांनीही या घटनेचे अतीव दुःख झाले. मुलगी धायमोकलून रडत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले. तरीही ते मुलीला धीर देण्याचा प्रयत्न करीत होते. प्रदीप नाखवा यांनी आपला संताप व्यक्त केला असून त्यांनी आपला राग प्रशासनावर काढला आहे. प्रशासन केवळ श्रीमंतांचे आहे. या जगात गरिबांचा कुणीही वाली नाही. केवळ श्रीमंत लोकांचेच ऐकले जाते. या प्रकरणी सर्व राजकारण सुरू आहे, असे ते माध्यमांपुढेच आपले अश्रू ढाळताना म्हणाले.

वडील मिहीरला म्हणाले तू पळून जा

या अपघाताप्रकरणी आता अनेक खुलासे समोर येत आहेत. कावेरी नाखवा यांना धडक दिल्यानंतर आरोपी मिहीर याने आपले वडील राजेश शाह यांना फोन केला होता. त्याने त्यांना संपूर्ण घटनाक्रम सांगितल्यानंतर राजेश यांनी त्याला पळून जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच हा अपघात चालक राजऋषी बिडावत याने केल्याचे खोटे सांगण्याची सूचनाही केली होती.

कावेरी नाखवा अभिनेते जयवंत वाडकरांची पुतणी

अपघातात मृत झालेल्या कावेरी नाखवा मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते जयवंत वाडकर यांची सख्खी पुतणी आहेत. वाडकर यांनी या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आपला संताप व्यक्त केला आहे. एका माध्यमाशी बोलताना त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली. बेदरकार पद्धतीने गाडी चालवणे ही केवळ विकृती आहे. गाडी चालवणाऱ्या प्रत्येक माणसाला या सगळ्याची जाणीव झाली पाहिजे. अपघातानंतर कार तशीच सोडून पळून जाणे हे आणखी वेदनादायी आहे, असे ते म्हणाले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+