वरळीत पुन्हा हिट अँड रन : BMW कारने तरुणाला उडवलं, तरुणांचा मृत्यू
पुणे- मुंबई -नागूपर हिट अँड रन प्रकरणाच्या घटना ताजी असतानाच वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरणाची घटना घडली आहे वरळीत बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील व्यावसायिकाच्या गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला आहे. विनोद लाड असं मृत या तरुणाचं नाव आहे.
वरळी सीफेस रोडवर 20 जुलै रोजी बीएमब्यल्यू कारने विनोदच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. ही धडक इतकी जोरदार होती की विनोद खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विनोदवर नायरच्या अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर शनिवारी उपचारादरम्यान विनोदचा मृत्यू झाला आहे.

विनोदचा अपघात झाला ती कार ठाण्यातील एका व्यावसायिकाची असल्याची माहिती आहे. वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी ते वरळीमध्ये आले होते. अपघात घडला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर मोटरगाडी चालवत होता, असे तक्रारीत म्हटलं आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विनोद हा ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर तो कामाला होता. सध्या तो हिल रोड येथे त्याच्या चुलत बहिणीकडे राहत होता. विनोदच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ज्याठिकाणी कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तिथून फक्त 100 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे












Click it and Unblock the Notifications