धक्कादायक! अगोदर आईचा विश्वास संपादन केला, नंतर तिचे बाळच चोरले; मात्र त्यानंतर काही तासांतच...

नाशिक जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच दिवसांचे बाळ चोरीला गेल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे ज्या महिलेने बाळ चोरले त्या महिलेने बाळाच्या आईशी काही तासांपूर्वीच ओळख निर्माण केली होती. मात्र डिस्चार्जच्या वेळी या महिलेने संधी साधत पाच दिवासांचे बाळच गायब केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत या बाळाला पुन्हा आईच्या कुशीत आणले.

Nashik Police

नेमकं काय घडलं..?

मूळचे उत्तर प्रदेशचे व सध्या सटाणा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या शेख कुटुंबातील सुमन अब्दुल खान हिची २९ डिसेंबरला नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसुती झाली. बाळ बेबीकेअर युनिटमध्ये होते. त्याच दरम्यान तेथील एका संशयीत महिलेने सुमन शेख हिच्या ओळख निर्माण केली. चार पाच दिवस शेख कुटुंबासोबत या महिलेने चांगली बातचीत सुरु ठेवली. तिचे नातलग शेजारच्या वार्डमध्ये अँडमिट आहे, असे तिने सांगितले होते. मात्र सुमन शेख हिच्या डिस्चार्जच्या दिवशी या महिलेने संधी साधली.

महिलेने संधी साधली

बाळ व मातेची प्रकृती ठणठणीत असल्याने दोघांनाही शनिवारी डिस्चार्ज देण्याचे जिल्हा रूणालयातील परिचारिकांनी सांगितले. त्यानुसार बाळाचे वडील रुग्णालयात डिस्चार्ज व कागदपत्रांची पूर्तता करत होते. त्याचवेळी महिला बाळाच्या आईजवळ आली. बोलणे सुरु असतानाच संशयित महिलेने बाळंतीणीचे कपडे, साहित्य व बाळाला मी सांभाळते व परिसरात फिरवते, असे सांगितले. मातेचा तिच्यावर विश्वास असल्याने व तोंडओळखीने तिने बाळ महिलेकडे सोपविले. त्याचवेळी बाळाची आई आवरत असताना महिलेने बाळाच्या आईच्या विश्वासघात करुन काही क्षणांत बाळ चोरुन पळ काढला.

पोलिसांची तत्परता

घटनेची माहिती कळताच परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड व गुन्हेशाखा युनिट एकचे पथक दाखल झाले. यानंतर पोलिसांनी चौकशी करुन बाळाचा व महिलेचा शोध सुरु केला होता. चोरी गेलेले बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आले. जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेलं बाळ अवघ्या काही तासात आईच्या कुशीत पोहोचले आहे. पोलिसांनी सपना मराठे (35, रा. धुळे) या महिलेला ताब्यात घेतले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+