सक्षमला का संपवलं? मुळ कारण काय; आंचल-सक्षमच्या प्रेमकहाणीचा दुःखद अंत, नांदेड खून प्रकरण वाचा
Why was Saksham tathe killed What is reason : महाराष्ट्रातील नांदेड येथे आंतरजातीय प्रेमसंबंधातून घडलेल्या सक्षम ताटे (२०) या तरुणाच्या क्रूर हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेनंतर, त्याची प्रेयसी आंचल मामिडवार (२१) हिने मृतदेहाशेजारी बसून प्रतीकात्मक विवाह करत आपल्याच कुटुंबावर केलेले गंभीर आरोप अत्यंत धक्कादायक आहेत.
महाराष्ट्रात प्रेमसंबंधातून 'ऑनर किलिंग'ची घटना घडली. मृत सक्षम ताटे (वय २०) व आंचल मामिडवार (वय २१) यांचे एकमेकांवर प्रेम होते, तीन वर्षांपासून त्यांचे नाते होते. यानंतर या प्रेमाचा रक्तरंजित शेवट झाला असून आंचलने मात्र हार न मानता मृत प्रियकराशी प्रतिकात्मक विवाह केला सक्षम जिंकल्याचे म्हटले. या थरारक हत्याकांडाचा आणि संपुर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेऊया.

हत्येचे कारण काय? घटनाक्रम
सक्षम ताटे आणि आंचल मामिडवार यांच्या प्रेमाचा शेवट अत्यंत क्रूरपणे झाला. सक्षमच्या हत्येमागील कारणे आणि त्या दिवसाचा घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे.
मूळ कारण काय? : सक्षम आणि आंचलच्या नात्याला आंचलच्या कुटुंबीयांचा तीव्र जातीभेदामुळे विरोध होता.
हत्येचा उद्देश माहिती: आंतरजातीय प्रेमसंबंधाला आंचलच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध आणि जातीभेद, आंचलच्या कुटुंबीयांना सक्षम दलित समाजातून असल्याने हे नाते मान्य नव्हते.
अन् भावानेच विश्वासघात केला..
आंचलच्या म्हणण्यानुसार, तिच्या भावांनी सक्षमचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या लग्नाची तयारी दर्शवली. त्यांनी सक्षमला लग्नाची तयारी करण्याची खात्री दिली होती, पण शेवटच्या क्षणी त्यांनी विश्वासघात केला आणि हत्येचा कट रचला.
हत्या कधी झाली?
२७ नोव्हेंबर २०२५ रोजी गुरुवारी सायंकाळी आंचलचा मोठा भाऊ हिमेश मामिडवार याने सक्षम आणि त्याच्या मित्रांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. हिमेशने सक्षमवर गोळी झाडली, जी त्याच्या बरगडीला लागली. त्यानंतरही न थांबता, हिमेशने जखमी अवस्थेत असलेल्या २० वर्षीय सक्षमच्या डोक्यात फरशी मारून त्याची जागीच हत्या केली.
आरोपी कोण?
हिमेश मामिडवार (आंचलचा भाऊ), साहिल मामिडवार (आंचलचा दुसरा भाऊ), गजानन मामिडवार (आंचलचे वडील) आणि इतर तीन जण (एकूण सहा आरोपी) या प्रकरणात असल्याचे सुत्रांनी सांगितले.
आंचलचे कुटुंबावर आरोप
मीडिया रिपोर्टनुसार, कुटुंबावरील आरोप आंचलने स्पष्ट केले की, तिच्या कुटुंबाने विश्वासघात केला आणि जातीभेदातून हत्या केली. तिचे वडील आणि भावांनी सक्षमला अनेकदा मारण्याची धमकी दिली होती. यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आंचलच्या भावांना हत्येसाठी प्रवृत्त केले. हत्येपूर्वी भावाला, "तुमच्या बहिणीच्या प्रियकराला का मारत नाही?" असे विचारले होते, असेही तिने सांगितले.
"मला न्याय हवा" -आंचलची मागणी
या घटनेच्या पार्श्वभुमीवर "मला न्याय हवा आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी" अशी तीव्र मागणी आंचलने केली आहे.
दरम्यान, आंचलने सक्षमच्या अंत्यसंस्कारापूर्वी त्याच्या मृतदेहाशेजारी बसून प्रतीकात्मक विवाह केला आणि आता ती सक्षमच्या कुटुंबासोबत कायमस्वरूपी राहणार आहे असे सांगितले आहे.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ!







Click it and Unblock the Notifications