Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मागे का बसवलं? काय आहे खरी वस्तूस्थिती अन् कारण जाणून घ्या

Why Uddhav Thackeray made to sit behind in India Aghadi meet : इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मागे बसल्याचे दिसून आले. त्यांना मागे बसवण्यात आले असे म्हणत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील लोकांकडून टीका केली जात आहे. यामुळे प्रश्नही असा निर्माण झाला की, उद्धव ठाकरेंना खरंच मागे बसवले होते का? यावर आता संजय राऊत यांचे मोठे विधान आले आहे, तर दुसरीकडे याचे नेमके कारणही स्पष्ट झाले आहे.

Why Uddhav Thackeray made to sit behind

Take a Poll

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप लावले होते तसेच मतदार याद्या पारदर्शक नसल्याचे म्हटले होते. यासंदर्भात ७ ऑगस्टला दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत त्यांनी सादरणीकरण केले. या सादरणीकरणादरम्यान उद्धव ठाकरे हे मागच्या खुर्चीवर बसलेले दिसले. नेमका हाच मुद्दा पकडत उद्धव ठाकरेंवर आणि युबीटीवर शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजप नेते टीका करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मागे बसवले होते असे दिसते, मात्र वस्तूस्थिती वेगळी असल्याचेही समोर आले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

उद्धव ठाकरे एकदम समोर बसले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंचे म्हणणे पोगे की, तेथून स्क्रिनसमोर बसल्याने बघण्यास त्रास होतो, जसे आपण सिनेमा बघण्यासाठी आल्यानंतर समोर बसल्यावर पाहण्यास त्रास होतो किंवा नीट दिसत नाही, त्यामुळे आम्ही सर्वच मागे बसलो, त्यात मी, कमल हसन, उद्धव ठाकरे आणि पवार साहेबहांसह इतर नेतेही मागे बसले होते. डोळ्यांचे आणि स्क्रिनचे कनेक्शन सुलभ व्हावे हा यामागे हेतू होता.

टीका करणाऱ्यांना संजय राऊतांनी म्हटले फालतू!

संजय राऊत यांनी या मुद्द्यावरुन टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला. भाजपचे आयटी सेलवाले किंवा इतर कोण ते लोक असेल ते फालतू आहेत. त्यांना हे समजायला हवे. अजून काही फोटो त्यांना दिसले नाहीत का, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकच कुटुंब होते जे राहुल आणि सोनिया गांधी यांचे नवीन घर
ठाकरे फॅमिलींना दाखवले.

सादरणीकरणासाठी जिथे पाहण्याची सुविधा वाटते तिथे लोक बसत असतात, मतचोरीसंदर्भात भाजपच्या विरोधातील ते सादरणीकरण होते म्हणून अशी टीका केली जाणारच. असेही राऊत यांनी म्हटले आहे.

नरेश मस्केला राऊत म्हणाले दुतोंडे गांडूळ

ठाकरे मागे बसल्यावरुन शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केली व शिवरायांचा वारसा आहे आणि ते मागे बसताहेत म्हणजे कुठे ना कुठे अपमान होत आहे असे म्हटले . यावर संजय राऊत यांनी
"अरे त्या मस्केला सांगा" असे म्हणत खासदार नरेश म्हस्के यांचा दुतोंडे गांडूळ असा उल्लेख केला, त्यानंतर ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसले नाही का? मोदी आणि शहांची चाटुगिरी करता तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का..

नरेश मस्केंची 'ती' खरमरीत पोस्ट..

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+