आका-आका करणाऱ्या सुरेश धसांचाच 'आका' सुषमा अंधारेंनी काढला; ट्विटमध्ये पहा नेमकं काय म्हणाल्या...

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिना उलटला आहे. या हत्येप्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अद्यापही या हत्येतील एक आरोपी फरार आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात रोज मोर्चे निघत आहेत. अशात आष्टीचे आ. सुरेश धस यांनी वेळोवेळी आका आणि आकाच्या आकाचा उल्लेख करत या प्रकरणात ट्विस्ट आणला होता. मात्र आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीच सुरेश धसांच्या आकाचा उल्लेख केल्याने चर्चा वाढल्या आहेत.

Sushma Andhare

आकाचा वारंवार उल्लेख

संतोष देशमुख हत्ये प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आ. सुरेश धस यांनी वारंवार आका आणि आकाचा आका हे शब्दप्रयोग करत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यानेच देशमुख यांच्या हत्येचा कट रचला, असा आरोप केला जात आहे. वाल्मिक कराड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची चौकशी सुरु आहे.

सुषमा अंधारेंचे ट्विट चर्चेत

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या ट्विटमध्ये म्हणतात, "सन्मा. धससाहेब, पिकविमा, मल्टीस्टेट बँक घोटाळे, खून अपहरण खंडणी यात गुन्हेगार, आका आणि आकांचे आका यांना शिक्षा होण्यासाठी आपण जंग जंग पछाडताय. आपला लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे. पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!"

धसांचा आका कोण

सुषमा अंधारे यांच्या या पोस्टनंतर आता अनेकजण आका आणि आकांचे आका कोण, असा प्रश्न विचारत आहेत. तसेच त्यांच्या पोस्टनंतर सुरेश धस यांचे आका कोण, असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे. मात्र अद्याप यावर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या ट्विटवर सुरेश धस काय उत्तर देतात हे पाहणेही मनोरंजक ठरणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+