Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांचे नातू युगेंद्र पवारांचं आज लग्न! कोण आहे त्यांची होणारी पत्नी तनिष्का कुलकर्णी?

Who is Tanishka Kulkarni : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि मुंबईच्या तनिष्का कुलकर्णी यांचा आज (३० नोव्हेंबर २०२५) विवाह सोहळा पार पडत आहे. ४ ऑगस्टला दोघांचा साखरपुडाही झाला आहे, याबाबत सोशल मीडियावरील एक्स अकाऊंटवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. आज तनिष्का कुलकर्णी आणि युगेंद्र पवार यांचा विवाह संपन्न होत आहे.

या विवाहाच्या पार्श्वभुमीवर आता पवार कुटुंबाची होणारी नवी सून तनिष्का कुलकर्णी कोण आहेत, त्या काय करतात यांबद्दल लोक जाणून घेण्यास उत्सुक आहेत, म्हणूनच त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया.

Who is Tanishka Kulkarni

तनिष्का कुलकर्णी यांची ओळख

  • मूळ गाव/ठिकाण: तनिष्का कुलकर्णी ह्या मूळच्या मुंबईतील आहेत.
  • कुटुंब: तनिष्का कुलकर्णी यांचे वडील मुंबईतील प्रभादेवी परिसरातील रहिवासी असून ते नामवंत उद्योगपती आहेत.
  • शिक्षण: तनिष्का यांचे शालेय शिक्षण मुंबईतून पूर्ण झाले आहे.
  • उच्च शिक्षणासाठी त्यांनी विदेशातील लंडन गाठले होते.
  • लंडनमधील प्रतिष्ठित कास बिझनेस स्कुलमधून त्यांनी फायनान्स क्षेत्रात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

पवार कुटुंबाशी जोडले नाते

खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत युगेंद्र आणि तनिष्का यांच्या साखरपुड्याची माहिती सार्वजनिक केली होती.

सुप्रिया सुळेंची पोस्ट

युगेंद्र आणि तनिष्का यांचा घरगुती पद्धतीने साखरपुडा ४ ऑगस्टला पार पडला. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर माहिती शेअर केलेली आहे.

"माझा भाचा युगेंद्रचा तनिष्कासोबत साखरपुडा झाला आहे. दोघांनी आयुष्यभर आनंदी आणि एकत्र रहावं, खूप शुभेच्छा. पवार कुटुंबामध्ये तनिष्काचे स्वागत करताना आनंद होत आहे," अशा शब्दांत त्यांनी या नात्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

युगेंद्र यांनी आजोबा शरद पवारांचा ऐकला सल्ला!

मिळालेल्या माहितीनुसार, युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाला शरद पवार यांनी अक्षता टाकायची संधी कधी देताय? अशी विचारणा केली होती. आजोबांचा सल्ला मनावर घेत युगेंद्र पवार यांनी थेट साखरपुड्याची बातमी दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटस मधून दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे.

पवार कुटुंबातील दुसरी आनंदाची बातमी

दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचाही साखरपुडा झाला होता. त्यावेळीसुद्धा कुटुंबातील आत्याबाई म्हणजेच सुप्रिया सुळे यांनीच ही आनंदाची बातमी सर्वांना कळवली होती. आता युगेंद्र आणि तनिष्का यांचा आज विवाह सोहळा होत असल्याने पवार कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+