Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मूसेवाला, सिद्दीकी यांच्या हत्येत हात, कोण आहे लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार, शार्प शूटर सौरव महाकाल?

Baba Siddique Murder Case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची शुक्रवारी रात्री हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने काल पुण्यात येत प्रवीण लोणकर याला अटक केली. प्रवीण लोणकर हा शुभू लोणकरचा भाऊ असून, त्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या वतीने सिद्धीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. शुभू लोणकर हा सध्या फरार आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना प्रवीण लोणकर यानेच पुण्यात आश्रय दिल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, या हत्याकांडात सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे याचेही नाव आता समोर येत आहे. सिद्धू मुसेवाल हत्या प्रकरणात सौरभ नुकताच जामिनावर सुटला आहे.

तिसरा शूटर अद्याप फरार

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या तीन आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली. त्याचवेळी तिसरा हल्लेखोर फरार झाला. हा फरार झालेला आरोपी शिवकुमार गौतम असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोघांना 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. पोलिसांनी धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग यांच्याकडून 28 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. दरम्यान, शिवकुमारचाही शोध सुरू आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा फरार आरोपी झीशान अख्तर हा सौरभ महाकालचा मित्र असल्याची मोठी बातमी समोर येत आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकीची नोट मिळाल्याप्रकरणी सौरभ महाकाळची चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक पुण्यात गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सौरभ महाकाळ यांचे खरे नाव सिद्धेश कांबळे आहे.

Who is Saurav Mahakal

सौरभ महाकाल यापूर्वीही होता रडावर

2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पुण्यातून सौरभ महाकालला अटक केली होती. सिद्धेश हिरामण कांबळे असे त्याचे खरे नाव आहे. सौरभ महाकाल हा सुरुवातीला अरुण गवळी गँगमध्ये होता. त्यावेळी संतोष जाधवसोबत त्याने अनेक सुपाऱ्या यशस्वी पूर्ण केल्या होत्या. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यांनुसार सौरभ हा सुपारी घेऊन कोणतेही काम स्वतः करतो. यासाठीच तो कुप्रसिद्ध आहे. झीशान अख्तर हा पंजाबच्या जालंधरचा रहिवाशी आहे. त्याची कुंडली काढल्यावर सौरभचे नाव समोर आले. सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडात सौरभ आरोपी असून तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता.

प्रवीण लोणकरला पुण्यात अटक

बाबा सिद्दीकी (वय 66) यांच्यावर शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे भागात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोळीबारानंतर काही वेळातच, पोलिसांनी दोन कथित हल्लेखोरांना अटक केली. त्यापैकी एकाचे नाव गुरमेल बलजीत सिंग (23, रा. हरियाणाचे रहिवासी आहे) आणि दुसरा आरोपी उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. हत्येनंतर लगेचच अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींपैकी एकाला मुंबईतील एका न्यायालयाने रविवारी २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दुस-या आरोपीने अल्पवयीन असल्याचा दावा केल्याने त्याचे वय किती आहे हे जाणून घेण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले होते. त्यालाही 21 तारखेपर्यंत कोठडी मिळाली आहे. दरम्यान, रविवारी पुण्यातून प्रवीण लोणकरलाही अटक करण्यात आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+