थेट अजितदादांशी पंगा ! कोण आहेत लेडी सिंघम आयपीएस अंजली कृष्णा? वाचा कृष्णा यांचा संघर्ष...
सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये अवैध मुरूम उत्खननावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दम दिल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर आयपीएस अंजली कृष्णा या चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल आणि या घटनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नेमका प्रकार काय घडला?
माढा तालुक्यातील कुर्डू गावामध्ये अवैध मुरूम उत्खननाची तक्रार स्थानिक प्रशासनाकडे आली होती. यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी यांच्यासह सरकारी पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, तेथे उपस्थित काही स्थानिकांनी लाठ्या-काठ्या घेऊन अधिकाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तणाव वाढला.
याचवेळी, सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजली कृष्णा आपल्या टीमसह तिथे दाखल झाल्या. त्यांनी परिस्थिती हाताळत अवैध उत्खननावर कारवाई सुरू केली. मात्र, कारवाई सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने थेट अजित पवारांना फोन लावला. या फोनवर अजित पवार यांनी थेट अंजली कृष्णा यांच्याशी संपर्क साधून त्यांना दम दिल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने राजकीय स्वरूप धारण केले आहे.
अंजली कृष्णा यांची ओळख आणि पार्श्वभूमी
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचे पूर्ण नाव अंजना कृष्णा व्ही.एस. आहे. सध्या त्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) म्हणून कार्यरत आहेत. अंजना कृष्णा यांची ओळख एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक आयपीएस अधिकारी म्हणून आहे.
अंजना कृष्णा यांनी यूपीएससी सीएसई 2022-23 परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर ३५५ वा क्रमांक मिळवला होता. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जन्मलेल्या अंजना कृष्णा यांचे वडील बीजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे, तर त्यांची आई सायना न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करतात.
करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही.
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 2, 2025
त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला.#ajitpawar #AnjaliKrishna pic.twitter.com/ag2DNuf3do
मूळच्या मलयंकीझू येथील असलेल्या अंजना कृष्णा यांनी आपले प्राथमिक शिक्षण सेंट मेरी सेंट्रल स्कूल, पूजप्पुरा येथे पूर्ण केले. त्यानंतर, त्यांनी नीरामंकरा येथील एच.एच.एम.एस.पी.बी. एनएसएस महिला महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. अंजना यांनी याच महाविद्यालयातून गणित विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर, त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करून यश मिळवले.
अजित पवार यांच्यासोबतच्या वादामुळे सध्या अंजली कृष्णा यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर मोठी चर्चा सुरू आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे अनेकजण कौतुक करत आहेत. हा वाद पुढे काय रूप घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications