बॉलीवूड स्टारशी मैत्री, माजी मंत्री ते दिलखुलास माणूस;जाणून घ्या- गोळीबारात ठार झालेले बाबा सिद्दीकी
Baba siddique marathi news : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात शनिवारी रात्री मृत्यू झाला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली. दसऱ्याच्या दिवशी एकीकडे उत्साहाचे वातावरण असताना राज्यातील सर्वात मोठी व धक्कादायक बातमी रात्री उशीरा आली.
बाबा सिद्दीकी यांच्यावर 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले, ज्यातील एक गोळ त्यांच्या छातीला लागली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आवे. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली होती. एसआरए प्रकल्पाच्या वादातून त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला होता. तर त्यांचा मुलगा देखील आमदार आहे.

चला तर गोळीबारात ठार झालेले बाबा सिद्दीकी यांची राजकीय, त्यांचे नेटवर्थ किती, व्यक्तिगत जीवनातील कहाणीविषयी, नेमका का झाली त्यांची हत्या? वाचा सविस्तर...!
कोण आहेत बाबा सिद्दीकी ?
बाबा सिद्दीकी हे केवळ राजकारणीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्यांचं नाव प्रसिद्ध होतं. दरवर्षी त्यांची इफ्तार पार्टी ही चर्चेत असते. या पार्टीसाठी फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नव्हे तर छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सही शामिल होतात. शाहरूख खान, सलमान खान हेही आवर्जून सिद्दीकी यांच्या पार्टीत शामिल होतात. सलमान खान याचे बाबा सिद्दीकीशी अतिशय जवळचे संबंध आहेत.
काँग्रेसच्या एका जुन्या नेत्यांपैकी एक असलेले बाबा सिद्दीकी बॉलिवूडमध्येही लोकप्रिय होते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ते काँग्रेसशी जोडले गेले. त्यानंतर त्यांनी अनेक आंदोलनांतही सहभग घेतला होता. त्यांनी मुंबईतील एमएमके कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर बाबांनी दोनदा नगरसेवक म्हणून काम पाहिले. यानंतर ते तीनवेळा काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेत आमदारही झाले.
अतिशय धक्कादायक!
— Supriya Sule (@supriya_sule) October 12, 2024
मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा… pic.twitter.com/3M01NqKzvO
बाबा सिद्दीकी संपत्ती?
बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांचे नेटवर्थ 7.2 मिलियन इतके आहे. पण त्यांच्या खऱ्या कमाईबाबत अधिकृत माहिती अज्ञात आहे. बाबा सिद्दीकी यांचे मनोरंजन क्षेत्रातील स्टार्सशी चांगले संबंध आहेत. रमजान दरम्यान ते दरवर्षी खूप मोठी पार्टी देतात. त्यामध्ये बॉलिवूडसह छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटीदेखील सहभागी होतात. मिळालेल्या माहितीनुसार, 2018 साली बाबा सिद्दीकी यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता, त्यामध्ये 462 कोटी संपत्ती असल्याचे समोर आले होते.
लग्झरी कारचाही शौक
बाबा सिद्दीकी यांना लग्झरी कार्सचीही आवड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ S क्लास, बीएडब्ल्यू 7 सीरिज आणि रोल्स रॉयस फँटम कार असल्याचे समजते. तसेच त्यांच्या ताफ्यात आणखीही अनेक आलिशान गाड्या आहेत.
सलमानसोबत खास नातं
बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांचे खूप जवळचे नाते आहे. ते दोघंही अनेकदा एकत्र दिसतात. अनेक समाजसेवेच्या कामातही सलमान बाबांसोबत दिसतो. सलमान खान हा केवळ त्याच्या चित्रपटांमुळेच नव्हे तर अनेक वादांमुळेही चर्चेत असतो. हिट अँड रन केस असो किंवा काळवीटाची शिकार, सलमानच्या अनेक कृत्यांनी खळबळ माजवली. याप्रकरणात सलमानला तुरूंगातही जावं लागलं होतं. जेव्हा जेव्हा सलमान अडचणीत सापडला, तेव्हा बाबा सिद्दीकी नेहमीच त्याच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याचे दिसले. त्याच्या प्रत्येक केसच्या सुनावणीदरम्यान बाबा सिद्दीकी कोर्टात हजर होते, किंवा ते सलमानच्या कुटुंबियांची मदत करताना दिसले.












Click it and Unblock the Notifications