Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींची कुंडली घ्या जाणून, हरियाणातील आरोपीने केला होता खून

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने दोन शूटर्सना अटक केली आहे. गुरमेल बलजीत सिंग (23, रा. हरियाणा) आणि धर्मराज राजेश कश्यप (19, रा. बहराईच, यूपी) अशी त्यांची नावे आहेत. तर तिसरा शूटर अद्याप पोलिसांच्या ताब्यात नाही. शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवा (20) असे त्याचे नाव असून तो यूपीच्या बहराइचा येथील राहणारा आहे. सद्या तो पुण्यात एका ठिकाणी कामाला होता. या घटनेनंतर तो अद्याप फरार झालेला आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, या तिन्ही आरोपींच्या क्राईम हिस्ट्री संदर्भातील माहिती देखील समोर आली आहे, जाणून घेऊया त्यांच्याविषयी सविस्तर...!

नेमकं पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे वर्णन कॉन्टॅक्ट किलिंग असे केले आहे. आता गुन्हे शाखा ही घटना घडवून आणणाऱ्या गोळीबाराच्या सूत्रधाराचा शोध घेत आहे. सदर आरोपींच्या क्राइम हिस्ट्रीसाठी मुंबई गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता, दोन्ही आरोपींविरुद्ध जिल्ह्यात कोणताही गुन्हा दाखल नव्हता.

Baba Siddique Death  Baba Siddique

गुरमेलने त्याच्या भावाचा केला होता खून

धर्मराज राजेश कश्यप आणि शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवा बहराइच जिल्ह्यातील कैसरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील गंडारा येथील रहिवासी आहेत. मात्र, हरियाणाचा रहिवासी असलेल्या गुरमेल बलजीतवर यापूर्वीच खुनाचा गुन्हा दाखल आहे. आरोपी गुरमेलचे आई-वडील मरण पावले आहेत, पण त्याची आजी फुली देवी जिवंत आहे आणि त्याचा एक लहान सावत्र भाऊ त्याच्या आजीसोबत राहतो. 2019 मध्ये गुरमेलने त्याच्या मोठ्या भावाला बर्फाच्या सुईने भोसकून ठार मारले होते.

धर्मराज व शिवा दोघेही पुण्यात करायचे मजुरीचे काम

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धर्मराज कश्यप आणि शिवकुमार उर्फ ​​शिवा गौतम हे दोघे मजुरीचे काम करण्यासाठी पुण्यात आलेले होते. शिवा पुण्यात एका भंगार विक्रेत्याकडे 5 ते 6 वर्षे काम करत होता. शिवानेही काही महिन्यांपूर्वी धर्मराजला पुण्याला कामानिमित्त बोलावले होते. सुपारी देणाऱ्या व्यक्तीने गुरमेलची शिवा आणि धर्मराज यांच्याशी ओळख करून दिली होती. मात्र, दोघेही पुण्याहून मुंबईत कसे पोहोचले, याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

शनिवारी रात्री बाबांचा झाला खून

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9:15 ते 9:30 च्या दरम्यान बाबा सिद्दीकी हे त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडून वांद्रे (पश्चिम) येथील त्यांच्या निवासस्थानाकडे जात होते. त्यानंतर तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला. बाबा सिद्दीकी यांना तातडीने वांद्रे (पश्चिम) येथील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरमेलच्या आजी फुलीदेवीने सांगितली त्याची कहाणी

हरियाणा येथील नरड येथील रहिवासी गुरमेलची आजी फुली देवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, गुरमेल आमच्यासाठी मेला आहे आणि आम्ही त्याच्यासाठी मेलो आहोत. 10-11 वर्षांपूर्वी आम्ही त्याला कुटुंबातून हाकलून दिले होते. तीन-चार महिन्यांपासून तो घरी आला नाही. तो कुठे गेला हे आम्हाला माहीत नाही, त्याने आम्हाला काही सांगितलेही नाही. फुली देवी म्हणाल्या की, घरी आल्यावर त्या त्याला भेटल्या नाही. तेव्हा त्या कचरा टाकण्यासाठी गेल्या होत्या. ना आमच्याकडे त्याचा फोन नंबर आहे ना तो कधी आम्हाला कॉल करत नाही. मी माझ्या 12-13 वर्षांच्या नातवासोबत राहते. गुरमेल चार महिन्यांपासून गावात देखील आलेला नाही.

भावाचा केला होता खून

आजीने सांगितले की, गुरमेल यापूर्वी तुरुंगात गेला होता. भावाचा खून करताना तोही भावासोबत होता. त्यानंतर तो तुरुंगात गेला. तो तुरुंगातून कसा बाहेर आला, त्याला जामीन कसा मिळाला हे आम्हाला माहीत नाही. त्याच्याशी अजिबात बोलत नाहीत, सणासुदीलाही तो घरी येत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+