फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चॅलेंज! मध्येच अशी कशी आली मिशी? राऊतांचे 'भारी' उत्तर, वाचा 5 मुद्यांत
Waqf Board Bill Updates Sanjay Raut's response to Devendra Fadnavis : "वक्क्फ बोर्ड विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध हे देवेंद्र फडणवीस सांगू शकतील का? इतर बिलांसारखेच हे बील आहे." असे म्हणत शिवसेना युबीटे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानाला राऊत यांनी एकप्रकारे सडेतोड उत्तर देत त्यांना काही सवाल केले आहेत.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी वक्क्फ बोर्ड विधेयकाला संघाचाच विरोध असल्याचा दावा केला आहे तशी आपल्याला माहिती आहे हे सांगितले. राऊत यांनी मांडलेल्या गोष्टी पाच मुद्द्यांत समजून घेऊया.

1 वक्क्फ बोर्ड विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध
"वक्क्फ बोर्ड विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध हे देवेंद्र फडणवीस सांगू शकतील का? इतर बिलांसारखेच हे बील आहे." असा सवाल करत संजय राऊत म्हणाले, लोकसभेत
वक्क्फ बोर्ड सुधारणा विधेयक हिंदुत्वासोबत जोडले जात आहे ते योग्य नाही. या विधेयकाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. ते एक साधारण बील आहे ते येते आणि जाते. तिहेरी तलाकचे विधेयक आणले त्याच्या बाजूने आम्ही होतो. कलम 370 चे विधेयक आणले गेले आम्ही त्याबाजूने होतो. कारण ते राष्ट्र आणि मुस्लिम महिलांसाठी महत्वपूर्ण होते. पण वक्क्फ बोर्डाचे विधेयक आहे त्यामुळे प्राॅपर्टी वाॅर चालणार आहे. कोणता हिस्सा कोणत्या भाजप प्रायोजित उद्योगपतीकडे जाईल हे यातून उद्दीष्ट साध्य केले जाणार आहे.
2. वक्क्फची संपत्ती उद्योगपतींच्या हाती जाणार
संजय राऊत म्हणाले, हे बील ना हिंदूंशी ना मुस्लिमांशी संबंधित आहे, या सरकारची मनीषा साफ आहे की, आपल्या खास उद्योगपतींना महत्वाच्या मोक्याच्या जागा, संपत्ती द्यावी त्यात मग वक्क्फ बोर्डाची संपत्ती का सोडायची..? ही संपत्ती भविष्यात उद्योगपतींच्या हाती जाणार आहे. वक्क्फ बोर्ड विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध हे देवेंद्र फडणवीस सांगू शकतील का? इतर बिलांसारखेच हे बील आहे.
3. विधेयकाला एनडीएतील पक्षांचाच विरोध
संजय राऊत म्हणाले, अनेक पक्ष जे एनडीएतही सहभागी आहेत जे या विधेयकाला विरोध करतील. मी शेवटपर्यंत पाहणार आहे की, तेलगू देसम आणि नितीशकुमारच्या पक्षाच्या सदस्यांची भूमिका काय राहील ... आज दोन्ही पक्षातही या बिलावरुन मतभेद आहेत. या विधेयकाला फक्त मुस्लिमांचाच विरोध आहे असे नाही.
4. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही...
संजय राऊत म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी वक्क्फ बोर्डाबाबत काही भूमिका मांडली होती का? देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना तसेच हिंदुत्व शिकवू नये. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पीळ देत होतो. आम्हाला त्यांनी हिंदुत्वाची भाषा शिकवण्याची गरज नाही. वक्क्फ विधेयक आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही.
5. वक्क्फ बोर्ड विधेयकाला संघाचा विरोध - राऊत
संजय राऊत म्हणाले, वक्क्फ बोर्डाच्या विधेयकांत केंद्र सरकार काही सुधारणा करु इच्छित आहे. या बिलाला फक्त मुस्लिमांचाच विरोध आहे असे नाही. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचाही या विधेयकाला पूर्ण पाठिंबा नाही. जसे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भातील भाजपच्या भुमिकेला विरोध केला होता याची गरज नाही असे संघाने म्हटले. या विधेयकासंदर्भातही संघाची भूमिका त्याच पद्धतीची आहे अशी माझी माहिती आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा विषय आणि या विधेयकाचा संबंध लावणे मुर्खपणा आहे.












Click it and Unblock the Notifications