वाल्मिक कराड जेलमध्ये तरी कार्यकर्त्यांची बीडमध्ये दहशत, पोलिस अधिका-यांच्या दाव्याने खळबळ

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असतानाही, त्याच्या कार्यकर्त्यांची जिल्ह्यात दहशत माजवत असल्याचा दावा बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या जबाबात कराडच्या गुन्हेगारी कारवायांबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विश्वंभर गोल्डे यांनी सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्यासमोर आपला जबाब नोंदवला आहे, यामध्ये त्यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीच्या कारवायांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

गोल्डे यांच्या जबाबानुसार, कराड हा सराईत गुंड असूनही बीड पोलिसांकडून त्याला दोन कर्मचारी संरक्षणासाठी दिले होते. त्याच्या अटकेनंतरही त्याचे कार्यकर्त्यांची जिल्ह्यात दहशत माजवत आहेत. या परिस्थितीमुळे बीड पोलीस दल नव्या वादात सापडले आहे. कराडच्या समर्थकांनी कोर्ट परिसरातसुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता, असा उल्लेख त्यांनी या जबाबात केला आहे.

walmik karad

वाल्मिक कराडला 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यातील सीआयडी पथकाने खंडणी प्रकरणात अटक केली होती. त्याने स्वतःहून आत्मसमर्पण केल्याचे पोलिसांनी सांगितले. 6 जानेवारी 2025 रोजी कराडच्या समर्थकांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गोंधळ घालत अटकेचा निषेध केला होता. त्यानंतर कराडला मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आरोपी करण्यात आले. त्याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे काही लोकांनी दगडफेक करून गोंधळ घातला होता, असं म्हटलं आहे.

23 फेब्रुवारी 2025 रोजी सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांचा जबाब नोंदवला. या जबाबाचा तपशील आता समोर असून यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. या जबाबात गोल्डे यांनी सांगितले की, "वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी त्याचे कार्यकर्ते बीड जिल्ह्यात दहशत कायम राखून आहेत." कराडच्या बंदोबस्तासाठी 18 अंमलदार आणि दोन आरसीपी प्लाटून तैनात करण्यात आले होते. 22 जानेवारीला त्याला न्यायालयात हजर करताना 6 अधिकारी, 33 पुरुष आणि 6 महिला पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते, असं त्यांनी म्हटलं आहे.

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात वाल्मिक कराडला 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण करावे लागले होते. या हत्येने बीडमध्ये खळबळ उडाली होती. आता वाल्मिक जेलमध्ये असूनही त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+