अगदी शेवटच्या टप्प्यात वारं फिरलं; विक्रोळीत सुवर्णा करंजेंचा बाण लागणार

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघापैकी विक्रोळी हा मतदारसंघ सध्या जास्त चर्चेत आला आहे. ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी ठाकरे गटाने तिसऱ्यांदा येथून उमेदवारी दिली आहे. मात्र यावेळी त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे.

हा मतदारसंघ चर्चेत यायचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आ. सुनील राऊत यांनी शिंदे गटाच्या महिला उमेदवाराविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर करंजे यांनी विक्रोळी पोलिसांत जात विनयभंग, धमकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकारानंतर सुनील राऊत अडचणीत आले होते. या तक्रारीनंतर या मतदारसंघाचं वातावरण फिरलं असल्याची चर्चा आहे.

Suvarna Karanje

मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला

विक्रोळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. शिवसेनेचे लिलाधर डाके हे या मतदारसंघावर सलग तीन टर्म आमदार होते. 2004 साली राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर हा मतदारसंघ 2009 साली मनसेकडे गेले. मनसेचे मंगेश सांगळे हे येथून आमदार झाले. मात्र त्यानंतर 2014 व 2019 साली या मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकला. खा. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे येथून दोन वेळा आमदार राहिले. यावेळी मात्र त्यांना हॅट्रीक साधने अवघड जाणार असल्याचे बोलले जातेय. कारण शिवसेनेचे फूट पडल्यानंतर या मतदारसंघातील शिवसैनिकही दोन गटांत विभागला गेला. गेल्या काही दिवसांत या मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाची ताकदही वाढल्याचे दिसत आहे.

आ. राऊतांच्या काळात समस्या जैसे थेच

जुन्या चाळींचा मतदारसंघ म्हणून विक्रोळीची ओळख आहे. इथे मराठी, गुजराती, मुस्लिम, आणि उत्तर भारतीय अशी बहुभाषिक लोकवस्ती आहे. या मतदारसंघात रमाबाई नगर, कन्नमवार नगर, कामराज नगर, कांजुरमार्ग पूर्व, भांडुप पूर्व, टागोर नगर असे वॉर्ड येतात. विक्रोळी मतदारसंघातील समस्या म्हणजे कन्नमवार नगरचा भाग सीआरझेड मध्ये येतो. त्यामुळं इथे विकासाला म्हणावी तशी गती नाही. झोपडपट्टी पुनर्वसन, चांगले रस्ते आणि अनेक झोपडपट्टीत पाण्याची समस्या अजून आहेत. याव्यतिरिक्त पायाभूत समस्या, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचे प्रश्न आदी प्रश्न विक्रोळी विधानसभा मतदारसंघ आहेत. दहा वर्षे आमदार असूनही आ. राऊत यांना हे प्रश्न सोडवता आलेले नसल्याने यावेळी शिवसेना शिंदे गटाला मतदार झुकतं माप देऊल, अशा चर्चा आहेत.

करंजे यांच्या विजयाच्या शक्यता

आ. सुनील राऊत यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही, असंही बोललं जातंय. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झालंय. दुसरीकडे मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी ही इथे अर्ज भरलेले असल्याने आ. राऊत यांच्या मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. दुसरीकडे महायुतीकडून भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मित्रपक्ष हे आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी जोर लावताना दिसत आहेत. त्यामुळे राऊत बंधूंना ही निवडणूक सोपी नसणार आहे.

महायुतीची विक्रमी विकासकामे

या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा आमदार असतानाही महायुतीने व शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघात विक्रमी विकासकामे केली. मुंबई मेट्रो लाईन-4 चे कामही अंतिम टप्प्यात आहे. ही मेट्रो गोदरेज कंपनी आणि विक्रोळीपर्यंत जाणार असल्याने विक्रोळीकरांना त्याचा फायदा होणार आहे. याशिवाय कन्नमवार नगर येथील क्रांतीवीर महात्मा फुले रुग्णालयही लवकरच होणार आहे. त्याचा फायदा विक्रोळीकरांना होणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या येथे हजारांवर आहे. एकट्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या येथे सुमारे 20 हजार महिला लाभार्थी आहेत. त्यामुळे यंदा शिवसेना शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे यांचे पारडे येथे सध्यातरी जड दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+