बारामती व परळीला पशुवैद्यकीय महाविद्यालय; मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतले'हे' सात महत्त्वाचे निर्णय
मुंबईत मंत्रालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. बारामती व परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली. याशिवाय मुळशी येथे कनिष्ठ स्थर न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. आजच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हे निर्णय झाले. दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत काय झाले निर्णय?
१. मुळशी तालुक्यातील पौड येथे लिंक कोर्टऐवजी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता.
२. ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यासाठी परवानगी
३. १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय अशा ३३२ गावठाणासाठी ५९९.७५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजूरी
४. महाराष्ट्र राज्य आधारसामग्री (डेटा) धोरणास मान्यता देण्यात आली. राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती तयार करण्यात येणार.
५. बारामती येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आील. त्यासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी देण्यात आली.
६. बीड जिल्ह्यातील परळी येथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी ५६४.५८ कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी देण्यात आली.
७. महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम १८(३) १९५५ मध्ये सुधारणा, तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश २०२५ ला मान्यता देण्यात आली.












Click it and Unblock the Notifications