"वाल्मिक कराडच्या एनकाऊंटरची ऑफर होती" 'या' निलंबित PIचा दावा, म्हणाले- एन्काऊंटरचे ऐवढे पैसे मिळतात
Valmik Karad's encounter was an offer claims suspended PI : मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण साऱ्या महाराष्ट्रात आजही गाजत आहे, ही हत्या अत्यंत निर्घुन पद्धतीने केली होती, आता या हत्येनंतर एका निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य समोर आले आहे.
"वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती" असा खळबळजनक दावा या पोलिस अधिकाऱ्याने केला आहे. रणजित कासले हे ते पोलिस अधिकारी असून ते बीडच्या सायबर विभागात ते पोलिस निरीक्षक होते. दरम्यान, कासले यांचे वेगवेगळे दावे सोशल मीडियावर आले आहेत.

रणजित कासलेंची व्हिडिओ पोस्ट, काय म्हणाले?
रणजित कासले यांनी व्हिडिओ पोस्ट करुन हा दावा केल्याचे समोर आले आहे. आपण अक्षय शिंदे प्रकरणाची बातमी पाहीली, यामध्ये न्यायालयाने पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करायची झाल्यास केंद्राची यंत्रणा गठीत करा मग त्यामुळे सत्य समोर येईल आणि फेक एन्काऊंटर कसे होतात हे मी सांगतो.
"मी एन्काऊंटरसाठी नकार दिला..! "
रणजित कासलेंनी म्हटले की, "मला ज्यावेळी मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर आली. त्यावेळी मी नकार दिला. एन्काऊंटरसाठी 10 ते 50 कोटींपर्यंत रक्कम दिले जाते, विशेष म्हणजे हवे तेवढे पैसे दिले जातात. आपण सायबर शाखेत असल्याने एन्काऊंटर करु शकतो हे माहित असल्याने मला ऑफर मिळाली होती" असा त्यांचा दावा आहे.
"फेक एन्काऊंटरसाठी 4 लोकांची असते टीम"
रणजित कासले यांनी दावा केला की, "फेक एन्काऊंटरसाठी चार लोकांची टीम असते. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहसचिवांची गुप्त बैठक होते. त्यात प्लॅन ठरतो. मग महत्वाच्या विश्वासू पाच ते सहा लोकांची टीम बनते आणि ठिकाण ठरवले जाते. घटनेची चौकशी जर करायची झाली तर सत्तेची ताकद असतेच. त्यातून सुटका कशी करवून घ्यायची याची हमीही दिली जाते."
"अक्षय शिंदेचा एन्काऊंट बोगस होता..." - कासले
कासले यांनी दावा केला की, " आरोपीच्या हातात बेड्या असतात, याशिवाय दोरीने पाय बांधलेले असतात.अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बोगस होता. " एकंदरीत कासले यांनी वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरबद्दल दावा केला असून फेक एन्काऊंटर होतात ते कसे होतात, याबद्दलही दावे केले आहेत.
कोण आहे वाल्मिक कराड?
वाल्मिक कराड याचा संतोष देशमुख अपहरण प्रकरणात हात असल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर त्यांचा निर्घुन खून करण्यात आला. यातील आरोपीचे वाल्मिक कराडशी घनिष्ठ संबंध असल्याचे समोर आले आहे आणि वाल्मिक कराड हा महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.












Click it and Unblock the Notifications