वाल्मीक कराड पुन्हा 14 दिवस कोठडीतच राहणार! विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसोबतचे CCTV फुटेज व्हायरल
Valmik Karad sent to 14 days judicial custody : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यावर मौखोका दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 22 दिवसांची पोलीस कोठडी होती. बुधवार दिनांक 22 रोजी कोठडी संपल्याकारणाने वाल्मीक कराड याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. जिल्हा न्यायाधीश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, विशेष सत्र न्यायाधीश मकोका सुरेखा आर. पाटील यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यापुर्वी वाल्मिक कराडला न्यायलयात हजर केले तेव्हा गोंधळ झाला होता. पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे अर्ज करून व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती. अखेर जिल्हा न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी घेण्यास परवानगी दिली.

त्यानुसार, आज 22 दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर वाल्मीक कराड याला जिल्हा सत्र न्यायालय येथे बुधवारी आज 22 जानेवारीला हजर केले होते. सुनावणी दरम्यान पोलिस यंत्रणेकडून तपास पूर्ण झाल्याचे न्यायालयामध्ये सांगण्यात आले. त्यानुसार जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. जिल्हा न्यायाधीश -1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, विशेष सत्र न्यायाधीश मकोका श्रीमती सुरेखा आर. पाटील यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणांमध्ये सरकार पक्षाचे सरकारी वकील बाळासाहेब दत्तात्रेय कोल्हे हे सरकार पक्षाच्या वतीने बाजु मांडली. गुरुवारी दिनांक 23 रोजी केज येथील खंडणी प्रकरणांमध्ये सुनावणी केली जाणार आहे.
बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खून करण्यात आला. यानंतर या प्रकरणाशी संबंधित वाल्मिक कराडसह मुख्य संशयित आरोपींना अटकही झाली.
संतोष देशमुख खून प्रकरणातील संशयितांसोबतच अपहरण प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव समोर आले आहे. यातच वाल्मिक कराड याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. यातच आता वाल्मिक कराड आणि खुनातील संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे.
व्हायरल फुटेजमध्ये काय?
व्हायरल सीसीटीव्ही फुटेज हे विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाचे आहे.29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराडसोबत प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. यातील प्रतिक आणि सुदर्शन हे संतोष देशमुख यांच्या खुनातील संशयित आहेत.
वाल्मिक कराडसोबत पीएसआय राजेश पाटीलही सीसीटीव्हीत
सुदर्शन, प्रतिक घुलेसह वाल्मिक कराड याचे फुटेज समोर आले या फुटेजमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले निलंबित पीएसआय राजेश पाटील हेही वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत.
वाल्मिक कराड आला होता शरण
संतोष देशमुख यांच्या अपहरण प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा पोलिसांना 31 डिसेंबरला शरण आला. दरम्यान सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला, काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे.
एसआयटीचा न्यायालयात काय होता दावा?
संतोष देशमुख खून प्रकरणात एसआयटीने न्यायालयात 15 जानेवारी 2025 रोजी एक गंभीर दावा केला. संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळी वाल्मिक कराडचे या प्रकरणातील इतर आरोपींसोबत फोनवर संभाषण झाले होते. संतोष देशमुखांचे 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 3.15 वाजेच्या दरम्यान अपहरण झाले होते. एफआयआरमध्ये याच वेळेचा उल्लेख आहे. त्याच दिवशी दुपारी 3.20 मिनिटे ते 3.40 या वीस मिनिटांच्या काळात वाल्मिक कराडचे संशयित आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये फोनवर संभाषण झाले.
वारंवार या वीस मिनिटांत त्यांचे फोन झाले. त्यांच्यात जवळपास 10 मिनिटे संभाषण झाल्याचा दावा एसआयटीने कोर्टात केला. वाल्मिक कराडने ज्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली होती, त्याच दिवशी त्यांचे अपहरण झाले असा दावाही एसआयटीने केला आहे.












Click it and Unblock the Notifications