Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs USA : 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम! वर्ल्ड कपचा सामना खेळताच 'हा' मोठा विक्रम!

Vaibhav Suryavanshi Records History : आयसीसी अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने अमेरिकेवर ६ गडी राखून मात करत विजयी सलामी दिली. या विजयापेक्षाही जास्त चर्चा सध्या भारताच्या एका १४ वर्षीय फलंदाजाची होत आहे. बिहारच्या वैभव सूर्यवंशीने मैदानावर पाऊल ठेवताच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

Vaibhav Suryavanshi Records History

काय आहे तो ऐतिहासिक विक्रम?

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात वैभवने वयाच्या १४ वर्षे २९४ दिवस असताना पदार्पण केले. यासह तो अंडर-१९ वर्ल्ड कपच्या इतिहासात १५ वर्षांपेक्षा कमी वयात खेळणारा पहिले भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कुमार कुशाग्र (१५ वर्षे ८८ दिवस) याच्या नावावर होता.

हेनिल पटेलची आग ओकणारी गोलंदाजी

१८ वर्षीय वेगवान गोलंदाज हेनिल पटेलने अवघ्या १६ धावांत ५ बळी घेत अमेरिकेचे कंबरडे मोडले. अमेरिकेचा डाव १०७ धावांत आटोपला. पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला ३७ षटकांत ९६ धावांचे लक्ष्य मिळाले.

भारताचा दणदणीत विजय

भारताने १७८ चेंडू राखून अमेरिकीने दिलेले लक्ष्य गाठले. अभियान कुंडूने नाबाद ४२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. जरी वैभव या सामन्यात केवळ २ धावा करून बाद झाला असला, तरी त्याच्या विक्रमी पदार्पणाने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना दखल घेण्यास भाग पाडले आहे.

कोण आहे वैभव सूर्यवंशी?

वैभव सूर्यवंशी हा मूळचा बिहारचा असून तो डावखुरा फलंदाज आहे. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्याने बिहारसाठी 'रणजी ट्रॉफी' खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अत्यंत कमी वयात व्यावसायिक क्रिकेटमध्ये मोठी खेळी करण्याची क्षमता असलेला वैभव सध्या भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे 'सेंसेशन' मानला जातो.

मूळ गाव आणि कुटुंब

वैभव बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर ब्लॉकमधील 'राजवा' गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील संजीव सूर्यवंशी हे पेशाने शेतकरी आहेत. वैभवला क्रिकेटपटू बनवण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे तर त्याची आई गृहिणी आहे.

वडिलांचे स्वप्न आणि संघर्ष

वैभवच्या वडिलांना स्वतःला क्रिकेटची खूप आवड होती, परंतु परिस्थितीमुळे ते पुढे जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनवण्याचे स्वप्न पाहिले. जेव्हा वैभव केवळ ६ वर्षांचा होता, तेव्हापासून संजीव सूर्यवंशी यांनी त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांनी स्वतःच्या शेतातच वैभवसाठी एक 'नेट' (पिच) तयार केले, जेणेकरून वैभवला सरावासाठी लांब जावे लागणार नाही.

सामान्य शेतकरी कुटुंबातून संघर्ष अन् सुरुवातीचा सराव

सुरुवातीची काही वर्षे वैभवने त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतातच सराव केला. त्याचे वडील स्वतः त्याला चेंडू टाकायचे. त्याची प्रतिभा पाहून नंतर त्याला व्यावसायिक प्रशिक्षणासाठी समस्तीपूर आणि त्यानंतर पाटणा येथे पाठवण्यात आले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येत असूनही, वैभवच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट कीट आणि प्रशिक्षणासाठी कधीही पैशांची कमतरता भासू दिली नाही. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात वैभव लहानाचा मोठा झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+