शिवरायांच्या पुतळ्याचा निधी नारायण राणेंच्या प्रचारासाठी वापरला; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट
Vaibhav Naik on Shivaji Maharaj Statue Collapsed : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे सुरूवातीपासूनच आक्रमक झाले. तर आज त्यांनी माध्यमांशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. मालवणमधील शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठीच्या निधीचा वापर नारायण राणेंच्या लोकसभा प्रचारासाठी वापरण्यात आला आहे, असा गंभीर आरोप नाईक यांनी केला.
आमदार वैभव नाईक म्हणाले की, पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत एकूण 26 लाख रुपये देण्यात आले आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जिल्हा नियोजनामधून 5, 54, 35,000 रुपये नौसेना दिनाला खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना दोन्हीकडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने जो कार्यक्रम मालवणमध्ये केला त्या कामाच्या पैशातून नारायण राणेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप नाईकांनी केला.

मोदींच्या रॅलीसाठी डीपीसीचा पैसा का?
आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर देखील निशाणा साधला. राणेंनी पुतळा कोसळला त्यात माझा हात असल्याचे पुरावे देणारे म्हटले होते, आता महिला उलटला तरी देखील पुरावे सापडले नाहीत का?,लोकांचे मुळ मुद्द्यावरुन लक्ष हटावे म्हणून अशा प्रकारे उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन देखील जिल्हा नियोजनाच्या पैशातून टाकलं आहे.
नेमकं काय घडलं?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र 26 ऑगस्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे.












Click it and Unblock the Notifications