सद्दाम, बगदादी आणि आता मादुरो: अमेरिकेच्या 'डेल्टा फोर्स'चा थरार; अर्धा तासांत हुकूमशहाचा खेळ खल्लास
Delta Force ghost unit explained : 3 जानेवारी 2026 ची मध्यरात्र... व्हेनेझुएलाची राजधानी कराकस गाढ झोपेत होती. अचानक सन्नाटा चिरत अमेरिकन हेलिकॉप्टर्सचा आवाज घुमला आणि अवघ्या ३० मिनिटांत होत्याचे नव्हते झाले.
जगातील सर्वात रहस्यमयी आणि घातक मानली जाणारी 'डेल्टा फोर्स' हवेच्या वेगाने आली आणि व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नीला त्यांच्याच घरातून उचलून गायब झाली. ही कोणत्याही हॉलिवूड चित्रपटाची कथा नसून, अमेरिकेच्या 'घोस्ट युनिट'ने प्रत्यक्षात घडवून आणलेली क्रांती आहे.

काय आहे ही 'डेल्टा फोर्स'?
अधिकृतपणे '1st SFOD-D' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दलाची स्थापना १९७७ मध्ये कर्नल चार्ल्स बेकविथ यांनी केली होती. नॉर्थ कॅरोलिना येथील फोर्ट ब्रॅगमध्ये यांचे मुख्यालय आहे.
ही सामान्य सेना नाही. येथे प्रवेश मिळवण्यासाठी जगातील सर्वात कठीण शारीरिक आणि मानसिक चाचण्यांतून जावे लागते. १० पैकी केवळ १-२ सैनिकच यात टिकू शकतात.
हे कमांडोज स्नायपिंग, अत्याधुनिक स्फोटकांचा वापर आणि जमिनीवरून, हवेतून किंवा पाण्यातून कोणत्याही वाहनावर हल्ला करण्यात माहीर असतात.
डेल्टा फोर्सची कार्यपद्धती: 'स्क्वॉडर्न' रचना
व्हेनेझुएलाच्या २,००० पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांना या मिशनची साधी चाहूलही लागली नाही, यामागे डेल्टा फोर्सची शिस्तबद्ध रचना आहे:
असॉल्ट स्क्वॉड्रन: थेट हल्ला करून लक्ष्याला (Target) ताब्यात घेण्याचे काम करते.
रेकी आणि स्नाइपर ट्रूप : गुप्त माहिती गोळा करणे आणि लांबून अचूक गोळीबार करणे.
एव्हिएशन स्क्वॉड्रन : स्वतःची विमान यंत्रणा, जी शत्रूच्या रडारवर न येता कमांडोजला उतरवते आणि बाहेर काढते.
कॉम्बॅट सपोर्ट टीम : तातडीची वैद्यकीय मदत आणि गुप्तचर माहिती पुरवते.
खौफनाक इतिहास: सद्दामपासून बगदादीपर्यंत
डेल्टा फोर्सने याआधीही जगाला हादरवणारी ऑपरेशन्स केली आहेत.
सद्दाम हुसेन (२००३) : इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेन एका 'स्पायडर होल'मध्ये लपला होता, तिथून त्याला खेचून बाहेर काढण्याचे काम याच फोर्सने केले.
अबू बकर अल-बगदादी (२०१९) : सीरियाच्या गुहेत लपलेल्या इसिसच्या म्होरक्याचा खात्मा डेल्टा फोर्सने केला.
ब्लॅक हॉक डाऊन (१९९३) : सोमालियातील भीषण युद्धात शत्रूच्या गराड्यात अडकूनही या दलाने दाखवलेले शौर्य आजही अजरामर आहे.
'ऑपरेशन एब्रिजॉल्व': मादुरोचा अंत आणि नवा संदेश
राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्यावरील ही कारवाई 'ऑपरेशन एब्रिजॉल्व' अंतर्गत करण्यात आली. अमेरिकेचा आरोप आहे की मादुरो नार्को-दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीमध्ये सहभागी होते.
या कारवाईचा जागतिक परिणाम
मादुरो यांची रवानगी आता न्यूयॉर्कमधील तुरुंगात झाली आहे. या कारवाईमुळे रशिया आणि इराणसारख्या देशांना अमेरिकेने कडक इशारा दिला आहे. जगातील इतर हुकूमशहांच्या मनात आता एकच भीती आहे "डेल्टा फोर्सच्या निशाण्यावर पुढचा नंबर कोणाचा?"












Click it and Unblock the Notifications