उद्धव ठाकरेंची भाजपला साद! अब्दुल सत्तारांविरोधात 'ही' रणनिती, म्हणाले- सिल्लोडला लागलेला कलंक पूसू
Uddhav Thackeray's appeal to BJP : उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपशी मतभेद असले तरीही कुणी बोलायला आलं तर मी तयार असल्याचं वक्तव्य केलयं. अब्दुल सत्तार यांची गुंडगिरी मोडण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी साथ द्यावी असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडच्या सभेत केलं.
उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडला लागलेला कलंक धुवून काढुया. आपली संस्कृती वेगळी आपले संस्कार वेगळे अशी साद उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सिल्लोड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेश बनकर यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांची सभा आज झाली त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडच्या सभेत अब्दुल सत्तार यांच्यावर शरसंधान साधलं. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारे उमेदवार अब्दुल सत्तार आहेत आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. एकूण संपूर्णपणाने यांचा सर्वांचा दर्जा खालावलेला आहे.
उद्धव ठाकरेंची भाजप कार्यकर्त्यांना साद
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन म्हणजे विनंती करतोय. तुमचे आमचे मतभेत आहेत असतील त्याच्यासाठी माझ्याकडे कुणी येऊन बोलायला तयार असतील तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे पण आता आपण सर्वजण मिळून सिल्लोडला लागलेला कलंक धुवून टाकूया. या हि संधी आहे. कारण आपली संस्कृती आपले संस्कार हे वेगळे आहेत.
भाजप नेते रावसाहेब दानवे काय म्हणाले?
रावसाहेब दानवे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, आमच्यापुढे दोन प्रश्न आहे की, हरवायचे कुणाला? सर्वात पहिला प्रश्न हा आहे की, आम्ही महाराष्ट्रातील जनतेला साद घालत आहोत की, उद्धव ठाकरेंना हटवण्यासाठी आम्हाला साथ द्या हा आमचा पहिला प्रश्न आहे. आता उद्धव ठाकरेंनी प्रश्न केला की, अब्दुल सत्तार यांना हटवायला आम्हाला साथ द्या तर मी म्हणतो की, तो पक्षांतर्गत प्रश्न आहे. या विषयावर मी फारसे भाष्य करणार नाही.
महाविकास आघाडी अन् ठाकरेंनाच हरवायचे आहे..
रावसाहेब दानवे म्हणाले की, मी सांगू इच्छितो की, आम्हाला महाराष्ट्रातील जनतेला हेच सांगतो की, उद्धव ठाकरेंना हटवण्यासाठी आम्हाला मदत करा. मी भाजपचा राज्याचा एक प्रमुख आहे, मी एका जागेचा विचार करत नाही तर आम्ही महायुतीचा विचार करतो. आधी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना हटवायचे. अब्दुल सत्तार यांच्याविषयी आम्ही काय करायचे ते बघू. माझा आणि सिल्लोडच्या उमेदवाराचा काहीच संबंध नाही मला उद्धव ठाकरे यांना हरवायचे आहे.












Click it and Unblock the Notifications