तुम्ही आम्हाला फोडलं तर आम्ही तुमचं डोकं फोडू... उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा, वाद वाढणार?
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरु आहे. खरी शिवसेना व खरे वाघ आपणच आहोत, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्यावर उद्धव ठाकरे यांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तुम्ही खरंच मर्द असाल तर, आमचा पक्ष तोडून दाखवा. जर असा प्रतत्न झाला तर, आम्ही तुमचे डोके फोडू, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

ऑपरेशन टायगरची चर्चा
शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदार पुन्हा शिवसेना शिंदे गटात सहभागी होतील, अशा चर्चा सुरु आहे. येत्या काही दिवसांत ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील काही नेते शिवसेना शिंदे गटात येणार असल्याचा पुनरुच्चार शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी केला होता. त्यानंतर पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भुकंप होईल, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे आमच्या नेत्यांना आणि खासदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला. उद्धव गटाच्या खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एकता दाखवली. ते म्हणाले, आपण सर्व नऊ खासदार एकत्र आहोत. शिंदे गट हा दावा कोणत्या आधारावर करत आहेत हे फक्त त्यांनाच माहित. आपण सर्वजण उद्धव ठाकरेंसोबत आहोत.
ठाकरेंचा इशारा
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ठाकरे म्हणाले, जर तुम्ही (एकनाथ शिंदे आणि भाजप) 'पुरुषांचे पुरूष' असाल तर ईडी, सीबीआय, आयकर आणि पोलिसांना बाजूला ठेवा आणि आमच्याशी लढा. खरी शिवसेना कोणती हे आम्ही तुम्हाला सांगू. तू आम्हाला फोडण्याचा प्रयत्न करशील, आम्ही तुझे डोके फोडू.
शिंदेंचा पलटवार
महाराष्ट्रातील ऑपरेशन टायगरवर शिंदे यांनी उद्धव यांना उत्तर दिले. ते म्हणाले, खरा वाघ आणि खरी शिवसेना आमच्यासोबत आहे. काही बनावट आहेत. जनतेने त्यांच्या मतदानातून हे सिद्ध केले आहे. हा फक्त ट्रेलर आहे...पिक्चर अजून यायचा आहे. अनेक मोठे नेते आमच्यात सामील होतील. आमचे दरवाजे उघडे आहेत. आम्हाला कोणतेही ऑपरेशन टायगर सुरू करण्याची गरज नाही. लोक आमच्यासोबत येत आहेत. शिंदे म्हणाले, आम्ही लोकांमध्ये राहून काम करतो. फेसबुक सरकार चालवत नाही. लोकांची मते काम करून मिळतात, आरोप करून नाही.












Click it and Unblock the Notifications