'मातोश्री'वर दिवसभर खलबतं! यादी जाहीर होण्यापूर्वीच ठाकरेंचे 40 शिलेदारांना AB फॉर्म, वाचा यादी
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीतील मित्रपक्षाकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली. जवळपास 182 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे. परंतु, अद्याप महाविकास आघाडीकडून एकही अधिकृत घोषणा झालेली नाही. असे असले तरी देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज सकाळपासून मातोश्रीवर मेगा बैठका सुरू आहेत. तर यादी जाहीर होण्यापूर्वीच आता पर्यंत 40 जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुतण्या अमित ठाकरेंविरोधात उमेदवार जाहीर
दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अर्थात उद्धव ठाकरे यांनी पुतणे अमित ठाकरे यांच्याविरोधात देखील उमेदवार घोषीत केला आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंविरुद्ध शिदे गटाचे सदा सरवणकर तसेच ठाकरे गटाचे महेश सावंत अशी तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर, आज तब्बल 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय. नाशिक मधून ठाकरे गटाने सुधाकर बडगुजर यांच्यासह वसंत गितेंनाही मैदानात उतरवलं आहे.
या उमेदवारांना मिळाले एबी फॉर्म, वाचा यादी व मतदारसंघ
१) सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम)
२)वसंत गिते(नाशिक मध्य)
३ )अद्वय हिरे (मालेगाव बाह्य)
४)एकनाथ पवार (लोहा कंधार)
५ )के पी पाटील, राधानगरी विधानसभा
६ )बाळ माने, रत्नागिरी विधानसभा
७) उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा
८ )अमर पाटील, सोलापूर दक्षिण
९) गणेश धात्रक, नांदगाव
१०)दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला
११) प्रविणा मोरजकर, कुर्ला
१२) एम के मढवी, ऐरोली
१३) भास्कर जाधव, गुहागर
१४)वैभव नाईक, कुडाळ
१५) राजन साळवी, राजापूर लांजा
१६) आदित्य ठाकरे, वरळी
१७) संजय पोतनीस, कलिना
१८) सुनील प्रभू, दिंडोशी
१९) राजन विचारे, ठाणे शहर
२०) दीपेश म्हात्रे, डोंबिवली
२१) कैलास पाटील, धाराशिव
२२) मनोहर भोईर, उरण
२३) महेश सावंत, माहीम
२४)श्रद्धा जाधव, वडाळा
२५) पाचोरा - वैशाली सूर्यवंशी
२६) नितीन देशमुख - बाळापूर
२७) किशनचंद तनवाणी - छत्रपती संभाजी नगर मध्ये
२८)छत्रपती संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे*
२९)वैजापूर मतदारसंघ - दिनेश परदेशी*
३०) कन्नड मतदारसंघ - उदयसिंह राजपूत*
३१) सिल्लोड मतदारसंघ - सुरेश बनकर
३२) राहुल पाटील - परभणी
३३) शंकरराव गडाख -नेवासा
३४) सुभाष भोईर - कल्याण ग्रामीण
३५) सुनील राऊत - विक्रोळी
३६) रमेश कोरगावकर भांडुप पश्चिम
३७) उन्मेश पाटील - चाळीसगाव
३८) स्नेहल जगताप - महाड
३९) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
४०) केदार दिघे- कोपरी पाचपाखाडी












Click it and Unblock the Notifications