Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'तुतारी'ला करावी लागणार 'पिपाणी'शी फाईट; काय म्हणतंय निवडणूक आयोग, वाचा संपूर्ण प्रकरण...

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र व झारखंड राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने दुपारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर शरद पवार गटाच्या तीन मागण्यांकडेही लक्ष वेधले.

काय होत्या शरद पवार गटाच्या मागण्या

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला पक्ष फूटीनंतर निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. या निवडणूक चिन्हाबाबत शरद पवार गटाने दोन विनंत्या केल्या होत्या. त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली. शरद पवार गटाची पहिली विनंती होती, की त्यांना दिलेलं चिन्हं योग्य आकारात नाही. मतपत्रिकेवर ते अगदीच छोटं दिसतं. शरद पवार गटाने तुतारीसारखंच दिसणारं पिपाणी हे चिन्ह हटविण्याची मागणीही केली होती. निवडणूक आयोगाने या दोन्ही मागण्यांवर विचार करावा, असं शरद पवार गटाचं म्हणणं होतं.

Sharad Pawar  NCP

निवडणूक आयोगाने विचारात घेतल्या मागण्या

या दोन्ही विनंत्यावर निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही त्यांची पहिली विनंती मान्य केली आहे. त्याची योग्य दखल घेतली. तुतारी चिन्ह मशिनवर नेमकं कसं दिसलं पाहिजे, हे आम्ही त्यांनाच विचारलं होतं. त्यांनी जे दोन पर्यांय दिले होते त्यापैकी पहिला पर्यात आम्ही निवडला. त्यांची दुसरी मागणी होती की, तुतारीसारखं दिसणारं पिपाणी हे चिन्ह आम्ही काढून टाकावं. मात्र पिपाणी हे चिन्ह तुतारीसारखं सेम नाही. त्यात बदल आहे. हे आम्ही त्यांना सांगितले आहे, असेही आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला तुतारीसारख्या दिसणाऱ्या पिपाणी चिन्हाचा सामना करावा लागणार, हे आता स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम झाला जाहीर

महाराष्ट्रात विधानसभानिवडणुकीचा कार्यक्रम निव़डणूक आयोगाने जाहीर केला. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होईल. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याच्या आधी निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांचा दौरा केला होता. त्यावेळी विविध राजकीय पक्षांशी चर्चा देखील केली होती. यावेळी काही राजकीय पक्षांनी त्यांच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या होत्या. यावर निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+