व्हेलेंटाईन रोमॅटिक करायचाय? पुण्याजवळील 'या' आठ ठिकाणी फिरायला गेलात, तर तुमचे प्रेम दुपटीने वाढेल
Valentines day 2025 : प्रेमी जोडप्यांना सर्वात जास्त आवडणारा महिना म्हणजे फेब्रुवारी... तरुणालाईला या महिन्याची उत्सुकता का असते, तर त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे व्हेलेंटाईन डे. देशभरात सध्या व्हेलेंटाईन वीक सध्या पूर्ण जोशात सुरु आहे.
जर तुम्ही पुणे किंवा परिसरातील असाल तर तुमचा व्हेलेंटाईन अजून रोमॅंटिक करण्यासाठी आम्ही पुण्याजवळची काही खास ठिकाणे तुम्हाला सांगणार आहोत. तेथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बिनधास्त फिरायला जावू शकता. पुणे शहराच्या आजूबाजूला जी रोमॅटिंक डेस्टिनेशन्स आहेत, त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

लोणावळा
लोणावळ्याबद्दल सांगायची गरज नाही. पुणे व मुंबई या दोन्ही शहरांपासून जवळ असलेले हे ठिकाण निसर्गसौंदर्याची खाण समजले जाते. थंडगार वारा आणि मनाला भावणारी हिरवळ हे लोणावळ्याचे वैशिष्ट्य आहे. यंदाचा व्हेलेंटाईन साजरा करण्यासाठी लोणावळ्यापेक्षा भारी ठिकाण दुसरे असूच शकत नाही.
पवना लेक
लोणावळ्याजवळ असणाऱ्या पवना धरण परिसराचे सौंदर्य या दिवसात चांगलेच खुललेले असते. पावसाळा आणि उन्हाळा हे दोन्ही ऋतूत पर्यटक येथे आकर्षित होत असतात. या दोन्ही ऋतूतील येथील वातावरण खूप रोमॅटिक असते. पवना धरण परिससात कॅम्पिंगची सुविधा असल्याने येथ जोडप्यांना मनसोक्त फिरता येते. पुणे शहरापासून हे ठिकाण जवळ असल्याने पुण्यातील अनेक प्रेमियुगुल येथे दिसतात. या व्हेलेंटाईनला तुम्ही या परिसरात फिरण्याचा प्लॅन नक्की आखू शकता.
इम्प्रेस गार्डनर
ही पुण्यातील ऐतिहासीक बाग ३९ एकरात विस्तारलेली आहे. प्रत्येक ऋतूत येथील वातावरण बदललेले असते. प्रत्येक ऋतूत निसर्गाचा गोडवा पर्यटकांना अनुभवता यावा, अशीच या बागेच रचना केलेली आहे. या बागेत सुमारे १८०० देशी-विदेशी झाडे आहेत. दोनशे वर्ष जुने वडाचे झाड असो किंवा अगदी दुर्मिळ कांचनवेल असो, येथील झाडांचे सौदर्यं पाहून प्रत्येकजण प्रेमात पडतो. याच बागेत यंदाचा व्हेलेंटाईन तुम्ही नक्की साजरा करु शकता.
मुळशी धरण
मुळशी पॅटर्न हा सिनेमा प्रत्येकाला माहीत आहे. तसेच मुळशी धरणही सर्वांना माहित असेलच. पावसाळ्यात आल्हाद, हिवाळ्यात गारवा आणि उन्हाळात शितलता देणारे हे धरण पुणेकरांचे हक्काचे धरण आहे. वनराई, वेगवेगळ्या जातीचे पक्षी, निसर्गसौंदर्य आणि विस्तीर्ण पसरलेले पाणी, या सगळ्यांसोबत यंदाचा व्हेलेंटाईन साजरा करता येऊ शकतो. मुळशी धरण पसिररात फिरायला आल्यावर तुमच्या जोडीदाराच्या मनातील प्रेम नक्कीच वाढेल.
सिंहगड
पुण्यापासून साधारणः २५ किलोमिटर अंतरावरील ऐतिहासिक ठिकाण म्हणजे सिंहगड. सह्याद्रीच्या डोंगरात असलेला हा गड आपल्या विशिष्ट निसर्गसौंदर्याने ओळखला जातो. हे ऐतिहासिक ठिकाण असले तरी, येथील निसर्गसौंदर्य आपल्या जोडीदाराला दाखविण्यासारखे आहे. यंदाचा व्हेलेंटाईन आपल्या पत्नीसोबत तुम्ही येथे नक्की साजरा करु शकता.
लवासा
निसर्ग आणि प्रेम यांचं अतूट नातं असतं. तसंच नातं पुणेकरांचं लवासाबद्दलही आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवायचा असेल तर लवासापेक्षा भारी पाँईंट दुसरा असू शकत नाही. पुण्यापासून ५७ किलोमिटर अंतरावरील हे ठिकाण यंदाच्या व्हेलेंटाईनसाठी बेस्ट पर्यांयांपैकी एक आहे. पुण्यापासून जवळ असल्याने एका दिवसाच्या प्लॅनमध्ये तुम्ही निसर्गासोबत एकरुप होऊ शकता.
कामशेत
ज्या जोडप्याला थरार आवडत असेल त्याने कामशेतला जावं. हे एक रोमँटिक ठिकाण असून येथे गेल्यावर तुमचा पैसा नक्की वसूल होतो. येथील निसर्ग प्रत्येकाला आवडणारा असाच आहे. शिवाय हे अगदी शांत ठिकाण असल्याने जोडप्यांना येथे अगदी मनसोक्त फिरता येतं. या व्हेलेंटाईनला तुम्ही कामशेतचा प्लॅनही नक्की करु शकता.
घोराडेश्वर हिल्स
पुण्यापासून अगदी जवळ असलेले घोराडेश्वर हिल्स हे ठिकाणही गेल्या काही वर्षांपासून प्रेमी जोडप्यांसाठी आवडते ठिकाण बनले आहे. अगदी ३०-३५ मिनिटांत ट्रेक करुन तुम्ही जोडीदारासोबत या टेकडीवर जावू शकता. येथील थंडगार वारा आणि रोमँटिक वातावरण तुमच्यातील प्रेम वाढवते. यंदाचा व्हेलेंटाईन तुम्ही येथे नक्की प्लॅन करु शकता.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications