एकनाथ शिंदेंचा औदार्याचा नवा अध्याय; शिवसेनेच्या खात्यातील रक्कम ठाकरे गटाला देणार
शिवसेनेत बंड होऊन दोन वर्षांपूर्वी त्यात दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी सुमारे ४० आमदारांना सोबत घेत भाजपशी हातमिळवणी करत, मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. ठाकरे गट सत्तेबाहेर राहिला. त्यानंतर या दोन्ही गटांबाबत न्यायालयात दावे सुरु झाले. त्यात शिवसेनेचे चिन्ह व पक्ष हे दोन्हीही शिंदे गटाला मिळाले. मात्र तेव्हापासून पक्षाच्या चल-अचल संपत्तीबाबत दावे सुरु होते. आता याच प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत २०२२ पूर्वीचे शिवसेनेच्या खात्यावरील सर्व पैसे उद्धव ठाकरेंना देण्याचे ठरवले आहे.

शिंदे यांनी घेतला निर्णय
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२२ मध्ये शिवसेनेत बंड झाले. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचा दावा मान्य करत, शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची संपत्ती आणि बँकेतील रक्कमेवर दावा करणार नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी 2022 पूर्वी शिवसेनेच्या बँक खात्यात असणारी रक्कम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला कळविलेही आहे.
ठाकरे सर्व रक्कम मिळणार
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे गट आर्थिक अडचणीत आला आहे. गेल्या निवडणुकीतही ही अडचण उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे बोलून होती. आता ठाकरेंची हिच अडचण दूर होणार आहे. शिवसेनेच्या खात्यावरील २०२२ पूर्वीची सर्व रक्कम उद्धव ठाकरे यांच्या गटाला मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. दोन्ही पक्षातील राजकीय कटुता विसरुन, शिंदे यांनी एक नवीन उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवले आहे.
यापूर्वीही दिली होती रक्कम
बंडानंतर ठाकरेंच्या मागणीनुसार एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच काही रक्कम ठाकरे गटाला दिल्याचे सांगितले जात आहे. आता २०२२ पूर्वीची सर्व उर्वरीत रक्कम ठाकरे गटाला परत करण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे शिंदे गटाने जोरदार स्वागत केले.












Click it and Unblock the Notifications