संतोष देशमुख हत्या प्रकरण; आका नेमका कोण..? कोर्टात वकिलांनी पहिल्यांदा सांगितलं नाव...
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना आज पुण्यात अटक करण्यात आली. आरोपींना मदत करणाऱ्यालाही मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापूर्वी वाल्मिक कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. आता या आरोपींना आज केज कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने वकील व पोलिसांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर इतर आरोपींना १४ दिवासांची कोठडी सुनावली. दरम्यान, आजच्या युक्तीवादात वकीलांनी आकाचे थेट नावच सांगून टाकल्याने एकच चर्चा सुरु झाली.

कोर्टात काय झाले?
केज कोर्टात आज सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना हजर करण्यात आलं. आरोपींना १५ दिवसांचा रिमांड मिळण्याची मागणी पोलिसांनी कोर्टासमोर केली. आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नसल्याचं पोलिसांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. पोलिसांचा मुद्दा आरोपींच्या वकीलांनी खोडून काढला. पश्चाताप नाही असं म्हणता येणार नाही. आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे पुरेसे मुद्दे नाहीत, असं वकीलांचं म्हणणं होतं. या गुन्ह्यातील जवळपास सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे, असं आरोपींचं म्हणणं होतं.
आकाचा पहिल्यांदाच उल्लेख
या प्रकरणात आ. सुरेश धस पहिल्यापासून आका-आका या शब्दाचा वापर करत होते. या प्रकरणात आरोपींचा आका कोण, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. सुरेश धस आक्रमकपणे आकाचा उल्लेख करत असल्याने व हा मुद्दा थेट अधिवेशनात गाजल्यानंतर आकाबाबत चर्चा वाढली होती. आजच्या सुनावणीत आरोपींच्या वकीलांनी आकाचा पहिल्यांदाच उल्लेख केला. आका-आका म्हटलं जातो तो आका म्हणजे विष्णू चाटेच आहे, असं वकिलांनी कोर्टाला सांगितलं. तो विष्णू चाटे आधीपासून कोठडीत आहे, त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद वकिलांनी केला.












Click it and Unblock the Notifications