VIDEO ! अगदी डोक्याजवळ घातल्या तरुणाला गोळ्या; भुसावळमधील थरारक हत्या सीसीटीव्हीत कैद

हॅाटेलमध्ये चहा पित बसलेल्या तरुणावर अंदाधूंद गोळीबार करुन त्याला ठार मारण्याची घटना आज भुसावळमध्ये घडली. या घटनेनंतर दुचाकीवर आलेल्या चार हल्लेखोरांनी जाताना हवेत गोळीबारही केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, महाराष्ट्रात कायदा व सुवस्था राहीली की नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तेहरीम नासिर शेख असे गोळीबारात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Bhusawal

कोठे घडली घटना?

भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात अमरदीप टॉकीज जवळील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. सकाळी सात वाजेच्या सुमारास चार अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरुन आले. त्यांनी तोंडाला मफलर, स्कार्फ गुंडाळला होता. सकाळी थंडी असल्याने या तरुणांनी तोंडाला बांधले असावे असे इतरांना वाटले. सकाळी सात वाजेच्या सुमारास हाँटेलमध्ये गर्दी होती. त्याच गर्दीत हे चारही हल्लेखोर घुसले. अगदी सिनेस्टाईल त्यांनी या हाँटेलात एन्ट्री केली.

नेमकं काय घडलं?

या हाँटेलात तेहरीम नसिर शेख हा चहा पित बसला होता. हल्लेखोर एकामागे एक थेट त्याच्या जवळ गेले. त्यांनी खिशातील बंदूक काढून त्याच्यावर चार ते पाच राऊंड फायर केले. अगदी काही फुटांवरुन या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तेहरीम जागीच ठार झाला. हल्ल्यानंतर एकच आवाज झाल्याने हाँटेलमधील इतर ग्राहक सैरावैरा पळू लागले. त्यानंतर हल्लेखोर बाहेर आले आणि त्यांनी दहशत करण्यासाठी पिस्तूलमधून हवेतही गोळीबार केला.

काय होते कारण?

हल्लेखोरांनी अगदी जवळून तेहरीमची हत्या केली. या हत्येमागे पूर्व वैमनस्य असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारानंतर मात्र परिसरात दहशत पसरली. घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान गोळीबार करून हत्या करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+