Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राजकारणात भूकंप! नाना पटोले हे RSSचं काम करतात; काँग्रेसच्याच नेत्याचा गंभीर आरोप

Serious allegations against Nana Patole- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. महायुतीने मविआचं अक्षरशः पानिपत केलं. त्यानंतर आता पराभूत उमेदवारांच्या मनातील खदखद बाहेर यायला लागली आहे. काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनी, तर आमच्या पराभवाला थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर नागपूरमधील पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत एकच गदारोळ उडाला.

Nana Patole

काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत आरोप

काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची आज पक्षश्रेष्ठींसोबत बैठक पार पडली. ही बैठक नागपूरमधील पराभूत उमेदवारांच्या गंभीर आरोपांनी चांगलीच गाजली. विशेष म्हणजे पराभूतांपैकी अनेक उमेदवारांनी आपल्या पराभवाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच जबाबदार असल्याचं पक्षश्रेष्ठींना सांगितलं. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. विदर्भातील काँग्रेसच्या पराभवाला फक्त नाना पटोले हेच जबाबदार आहेत, असं तेथील पराभूत उमेदवारांचं म्हणणं होतं.

नाना पटोलेंवर गंभीर आरोप

काँग्रेसचे नागपूर मध्य मतदारसंघाचे उमेदवार बंटी शेळके यांनी थेट नाना पटोलेंवर आरोप केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आरएसएसचे काम करत आहेत, असा आरोप बंटी शेळके यांनी केला. माझा पराभव माझ्याच काँग्रेसने केला, असं बंटी शेळके यांचं म्हणणं होतं. मला तिकीट दिलं, पण संघटनेचे पदाधिकारी माझ्यासोबत नव्हते, असंही ते म्हणाले. शेळके म्हणाले, "नाना पटोले हे शंभर टक्के आरएसएसचं काम करतात. मी टिळक भवनासमोर या गोष्टी बोलून आलो आहे. कारण आमच्या नेत्या प्रियंका गांधी या आल्यानंतरही तिथे काँग्रेसचा कोणताही नेता तिथे उपस्थित नसेल, तर इथली जबाबदारी कुणी घेतली पाहिजे..? असा सवालही बंटी शेळके यांनी उपस्थित केला.

अतिआत्मविश्वास नडल्याची भावना

या बैठकीत अनेकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर आरोप केल्याचं समजतं. नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते फिरले नाहीत, असा आरोपही या पराभूत उमेदवारांनी केला. काँग्रेसच्या वरिष्ठांना अतिआत्मविश्वासात नडला, असा आरोपही या बैठकीत करण्यात आला. पराभूत नेत्यांच्या या आरोपानंतर काँग्रेसचे इतर ज्येष्ठ नेतेही आवाक झाले. विदर्भातील नेते आमच्या प्रचाराला न आल्यामुळेच पक्षाची अशी परिस्थिती झाली, अशी खंत पराभूत उमेदवारांनी बैठकीत मांडल्याचेही समजते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+