मुंबईत ठाकरे गटाचीच हवा, अनिल परब यांचा दणदणीत विजय
मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांचा 44 हजार मतांनी विजय झाला आहे. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होती.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब पुन्हा विजयी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडलं होतं.
अनिल परब यांना आतापर्यंत 44,791 मते मिळवून विजयी होण्यासाठी मतांचा कोटा पूर्ण केला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली असून अनिल परब यांचा 44 हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
अनिल परब यांना मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. आता भाजप व शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये मोठा फरक पडला असून पहिल्या 2 फेरीतच अनिल परब यांनी मतांचा कोटा पूर्ण केला. मतमोजणीच्या 4 फेऱ्या होणार आहेत.
मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. भाजपचे उमेदवार किरण शेलार आणि अनिल परब यांच्यात सामना झाला.अनिल परबांच्या विजयामुळे शिवसेना ठाकरे गटाला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळालं आहे.गेली 30 वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे ठाकरे गटापुढे मोठे आव्हान होते.
यंदा भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली. मात्र मतदारांनी या निवडणुकीत भाजपाला नाकारलं आहे. तर दुसरीकडे कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय जवळपास निश्चित आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रमेश किर हे उभे होते.












Click it and Unblock the Notifications