पतीच्या हत्येनंतर उफाळली वेदना! तेजस्वी घोसाळकरांचा शिवसेनेला रामराम; BJPमध्ये प्रवेश का घेतला? वाचा

Tejasvi Ghosalkar Quits Shiv Sena UBT Joins BJP : दिवंगत शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी आज शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) राजीनामा देत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या निघृण हत्येनंतर एकट्या पडलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी हा निर्णय 'वेदनेतून' आणि 'मुलांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी' घेतला असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

आज दादर येथील भाजप कार्यालयात, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांनी हा पक्षप्रवेश केला.

Tejasvi Ghosalkar Quits Shiv Sena UBT

पक्षप्रवेशापूर्वीची भावूक पोस्ट: "नाती बदलू शकतात, पण ऋणानुबंध नाहीत..."

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी आपला निर्णय वेदनादायी असल्याचे स्पष्ट केले. उद्विग्न मनाने त्यांनी म्हटले की, "आज आपल्याशी संवाद साधताना माझे मन प्रचंड उद्विग्न झाले आहे."

अभिषेक घोसाळकर यांची हत्या आणि जबाबदारी

तेजस्वी घोसाळकर यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या पत्रानुसार, पती अभिषेक यांच्या निघृण हत्येनंतर दोन लहान मुले आणि जनतेच्या विश्वासाची जबाबदारी पेलताना तेजस्वी घोसाळकरांना अनेक अडचणी आल्या, पण जनतेच्या साथीमुळे त्या सावरल्या. सध्या राजकारण करताना आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना 'अपार अडचणींचा सामना' करावा लागत आहे. तसेच, मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 'वेगळ्या निर्णयाकडे पाहावे लागत आहे' असे त्यांनी स्पष्ट केले. "हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही," अशी ग्वाही त्यांनी शिवसैनिकांना दिली.

Take a Poll

राजकीय प्रवासाला भाजपमध्ये नवी दिशा

तेजस्वी घोसाळकर यांनी स्पष्ट केले की, राजकारण कधीही त्यांच्यासाठी महत्त्वाकांक्षेचे साधन नव्हते, तर सासरचे वातावरण आणि पतीला साथ देण्यासाठी त्यांनी या प्रवासात पाऊल ठेवले. मात्र, पतीच्या निधनानंतर आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत जनतेच्या प्रश्नांसाठी आणि मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी त्यांना एका खंबीर राजकीय ताकदीची गरज भासली. याच कारणामुळे, शिवसेना (ठाकरे गट) सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मी परतफेड करत राहील..

राजीनाम्याच्या पत्रात तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसैनिक, बंधू-भगिनी आणि कार्यकर्त्यांनी अंधाऱ्या काळात दिलेल्या साथीबद्दल आभार व्यक्त केले. "जिथे-जिथे, जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन," असा शब्द त्यांनी दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+