'भाजपमध्ये ३५ उपरे, ३७ अमराठी अन् उरलेले नात्यागोत्यातले!; अंधारेंनी मांडली भाजप नगरसेवकांची 'कुंडली
Sushma Andhare on BJP Over BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निकालानंतर सत्तास्थापनेचा पेच कायम असतानाच, शिवसेना ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"भाजपचे संख्याबळ ही केवळ 'बाहेरून' आणलेली सूज आहे," अशा शब्दांत त्यांनी भाजप नगरसेवकांची कुंडलीच जाहीर केली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपच्या विजयाचे 'पोस्टमॉर्टम': अंधारेंचे ट्विट चर्चेत
सुषमा अंधारे यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून भाजपच्या 84 नगरसेवकांचे विश्लेषण मांडले आहे. त्यांच्या मते, भाजपला मिळालेले यश हे त्यांचे स्वबळावरचे नसून ते 'उधारीचे' आहे.
३५ 'बाहेरचे' नगरसेवक: भाजपच्या निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी ३५ जण हे मूळ भाजपचे नसून इतर पक्षांतून आयात केलेले आहेत.
३७ अमराठी चेहरा : मुंबईत 'मराठी अस्मिते'चा मुद्दा तापलेला असताना, भाजपच्या निम्म्याहून अधिक (३७) जागा अमराठी मतदारांच्या जीवावर आणि अमराठी उमेदवारांमुळे आल्याचा दावा त्यांनी केला.
नातेवाईकांची भरती : उर्वरित नगरसेवकांपैकी १०-१२ जण हे प्रस्थापित आमदार आणि खासदारांच्या नात्यागोत्यातील आहेत.
"देवेंद्र फडणवीस खरोखरच 'चाणक्य' असते, तर त्यांनी आतापर्यंत महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला असता. पण त्यांना अजूनही मुंबईत एकहाती शतक गाठता आलेले नाही, ही त्यांची अश्वत्थाम्यासारखी न भरणारी जखम आहे," अशी जहरी टीका अंधारे यांनी केली.
फडणवीस चाणक्य असते तर आतापर्यंत महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून टाकला असता पण ते तसे करू शकत नाहीत. कारण फडणवीसांना अजूनही एकहाती शतक मुंबईत गाठता आलं नाही. ही अश्वत्थाम्याची न भरणारी जखम आहे.
— SushmaTai Andhare (@andharesushama) January 18, 2026
84 ची संख्या फक्त पाच ने वाढली. पण त्यातही 35 बाहेरून आलेले आहेत. 37 अ मराठी आहेत. आणि… pic.twitter.com/78QV3UZwUb
"ठाकरेंनी मैदान सोडले नाही": संघर्षाचा पाढा
पक्ष, चिन्ह आणि सोबतीला असलेले जुने सहकारी गेल्यानंतरही उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने लढले, त्याचे कौतुक अंधारे यांनी केले. पक्ष फुटलेला असतानाही मुंबईत ६५ हून अधिक नगरसेवक निवडून आणणे, ही ठाकरेंची मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पार्कवरील एका सभेने मुंबईतील वातावरण फिरले आणि मराठी माणूस ठाकरेंसोबत ठामपणे उभा राहिला.
न नैतिकतेचा विजय
"ठाकरे ईडी, सीबीआय किंवा निवडणूक आयोगाच्या मागे लपले नाहीत, त्यांनी उमेदवार विकत घेतले नाहीत, तर ते निधड्या छातीने लढले," असे म्हणत त्यांनी ठाकरेंच्या नेतृत्वाचे समर्थन केले.
मुंबईत 'मराठी विरुद्ध अमराठी' ध्रुवीकरण?
निवडणूक निकालांच्या कलानुसार, धारावीसह मुंबईतील बहुतांश मराठीबहुल भागांत ठाकरे बंधूंना मोठे यश मिळाले आहे. मात्र, उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांनी भाजपला एकगठ्ठा साथ दिल्याने भाजप-शिंदे युती काठावरच्या बहुमतापर्यंत (११८ जागा) पोहोचू शकली.
महापौर पदाचा सस्पेन्स वाढला
सध्या भाजप (८९) आणि शिंदे गट (२९) मिळून सत्तेच्या जवळ असले तरी, अंतर्गत नाराजी आणि ठाकरे गटाकडून सुरू असलेल्या 'गुप्त हालचाली' यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे. सुषमा अंधारे यांच्या या टिकेमुळे मुंबईच्या राजकारणातील 'मराठी अस्मिते'चा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications