Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आधी टोकाचा नकार, मग 'त्या' एका कारणाने दिला सुनेत्रा पवारांनी DCMसाठी होकार: वाचा 'इनसाईड स्टोरी'

Sunetra Pawar Deputy CM oath : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक पण भावनिक क्षण उभा ठाकला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अखेर सत्तेची सूत्रे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, या निर्णयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अत्यंत खडतर आणि भावनिक संघर्षाचा होता.

Sunetra Pawar Says Yes to Deputy CM Post

पहिले नकार, मग होकार: काय घडलं पडद्यामागे?

अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. सार्वजनिक जीवनापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देणाऱ्या सुनेत्रा वहिनींनी सुरुवातीला राजकारणात सक्रिय होण्यास आणि पद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात वेगाने हालचाली घडल्या.

कुटुंबातील एकाकी झुंज

ज्यावेळी अजित पवारांनी बंड केले होते, तेव्हा संपूर्ण पवार कुटुंब एका बाजूला आणि दादा एकटे दुसऱ्या बाजूला होते. त्या कठीण काळात केवळ सुनेत्रा वहिनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या.

अस्तित्वाचा प्रश्न

दादांनी अत्यंत परिश्रमाने उभा केलेला पक्ष आणि त्यांचे राजकीय वारसा टिकवणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे पक्षातील नेत्यांनी त्यांना पटवून दिले.

'ते' एक कारण

"जर तुम्ही आज जबाबदारी स्वीकारली नाही, तर अजितदादांनी पाहिलेली स्वप्ने अधुरी राहतील आणि पक्ष विखुरला जाईल," ही भावना त्यांच्या मनाला शिवली. पतीचे कष्ट वाया जाऊ नयेत, याच एका विचारातून त्यांनी जड अंतःकरणाने उपमुख्यमंत्री होण्यास संमती दिली.

आजचा घटनाक्रम: विधानभवन ते राजभवन

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे:

दुपारी २:०० वाजता : विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होईल. यात सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी अधिकृत निवड केली जाईल.

संध्याकाळी ५:०० वाजता : राजभवनावर राज्यपाल त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देतील. आज केवळ सुनेत्रा पवार यांचाच शपथविधी होणार असून इतर कोणत्याही मंत्र्याचा समावेश नसेल.

खातेवाटपाचे समीकरण: अर्थ खाते कोणाकडे?

अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदासोबतच 'अर्थ' आणि 'नियोजन' यांसारखी महत्त्वाची खाती होती. मात्र, सुनेत्रा पवारांच्या बाबतीत काही बदल अपेक्षित आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी सोपवली जाईल. महत्त्वाचे असलेले अर्थ खाते सध्या त्यांच्याकडे दिले जाणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या खात्याबाबत पुनर्विचार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विलीनीकरणाची चर्चा आणि भविष्याची रणनीती

पवार कुटुंबात सध्या विलीनीकरणाची चर्चा जोरात असली तरी, सुनेत्रा वहिनींचा पवित्रा स्पष्ट आहे. आधी पक्ष सावरणे, आमदारांची मोट बांधून ठेवणे आणि त्यानंतरच विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर शरद पवारांशी चर्चा करणे, अशी त्यांची रणनीती आहे. स्वतः पद स्वीकारून त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, अजितदादांचा गट पूर्ण ताकदीने मैदानात राहील.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+