सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रिपद हुकले, फडणवीस सरकारमध्ये नाही मिळाले स्थान, वाचा त्यामागील कारण
Sudhir Mungantiwar has No Chance of Ministerial Post in Fadnavis Government : नव्याने सत्ता रूढ झालेल्या महायुती सरकारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी चर्चा होती. परंतु, सुधीर मुनगंटीवार यांना फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ देण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा 27 हजार मतांनी पराभव केला. मुनगंटीवार यांचा हा सलग सातवा विजय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना सुधीर भाऊ म्हणून ओळखले जाते. परंतु त्यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात संधी का देण्यात आली नाही, याचा चर्चा सद्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुनगंटीवार यांचा राजकीय प्रवास
वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी मुनगंटीवार यांनी राजकीय जीवनात प्रवेश केला आणि ते विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढले. 1989 आणि 1991 च्या लोकसभा निवडणुका त्यांनी चंद्रपूर मधून लढवल्या मात्र दोन्ही निवडणुका त्यांची हार झाली. 1993 साली भारतीय जनता युवा मोर्चा या संघटनेच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1995 साली चंद्रपूर मधून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. शिवसेना भाजपा युती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले. भारतीय जनता पक्षात त्यांचा प्रभाव वाढत गेला. 1996 साली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र सचिव पदी आणि 2001 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांना नियुक्त करण्यात आले.

2010 साली प्रदेश भाजप अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आणि वनमंत्री पदाचा कार्यभार देखील त्यांच्याकडे देण्यात आला. शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत 34000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय मुनगंटीवार यांनी घेतला. वनमंत्री म्हणून वृक्षारोपणाचा त्यांनी घेतलेला कार्यक्रम विशेष गाजला. विविध अभिनव उपक्रम राबवून आपल्याकडील मंत्रालयात लक्षणीय काम करणे हा सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा राहिलेला आहे.
2019 साली ते पुन्हा विधानसभेत निवडून गेले मात्र दुर्दैवाने त्यावेळी युतीचे सरकार येऊ शकले नाही. 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या युतीचे सरकार आल्यानंतर त्यांना सांस्कृतिक मंत्रीपद देण्यात आले. ही जबाबदारी त्यांनी विविध उपक्रम राबवून यशस्वीपणे पार पाडली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. मात्र काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा दणदणीत पराभव केला. पराभवानंतर खचून न जाता उनगंटीवार यांनी नव्याने सुरुवात केली आणि बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव करून यशस्वी खेचून आणली. मंत्रिमंडळातील समावेशाने भाजपचा एक ज्येष्ठ नेता आणि अनुभवी नेता मंत्रिमंडळात सहभागी झाला आहे. आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत सभ्य आणि सुसंस्कृत तसेच अभ्यासू विधिमंडळ सदस्य अशी ओळख सुधीर मुनगंटीवार यांनी निर्माण केली आहे. आपल्या अनेक अभ्यासू भाषणांनी आणि नियम तसेच आयुद्धांचा वापर करून त्यांनी सभागृह अनेक वेळा गाजवले आहे.












Click it and Unblock the Notifications