धक्कादायक! शिंदे गटाच्या 'या' आमदाराच्या गाडीवर दगडफेक
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथील बाबा पेट्रोल पंपाजवळील कामगार कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. दगडफेक झाली त्यावेळी गाडीत शिरसाट यांच्या पत्नी, मुलगी व मुलगा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा दगड मारण्यात आला तेव्हा शिरसाट यांच्या पत्नी, कन्या आणि मुलगा गाडीत होते. रस्त्यावर भांडण सुरू असल्याने शिरसाट कुटुंबीयांनी गाडी थांबवली होती.

शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकल्याच्या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याशिवाय, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील जमा झाले होते. त्यानंतर काही काळ वातावरण तंग होते.
शिरसाट यांच्या गाडीवर कोणी दगड मारला, हे अद्याप कळू शकलेले नाही. रस्त्यावर झालेल्या भांडणादरम्यान शिरसाट यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला की, त्यांना लक्ष्य करण्यासाठी दगड मारण्यात आला? याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे. दरम्यान, सदर प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.












Click it and Unblock the Notifications